दोंडाईचा – Dondaicha – श.प्र :
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून जिल्हाधिकार्यांच्या आदेशनुसार दोंडाइचा शहरासह ग्रामीण भागात दि 13 रोजी रात्री 12 वाजेपासून ते दि. 17 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
त्यात दवाखाने, मेडिकल, कृषी, पेट्रोल पंप, सरकारी कार्यालये, बँक आदी अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. तर बाकी सर्व व्यवहार बंद असेल, अशी माहिती दोंडाईचा अपर तहसीलदार सुदाम महाजन, मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी दिली.
यावेळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. ललितकुमार चंद्रे, डॉ. हितेंद्र देशमुख, उपमुख्याधिकारी हर्षल भामरे, तलाठी संजीव गोसावी, आरोग्य निरिक्षक शरद महाजन, विक्रम पाटील, प्रविण महाजन, कृष्णा नगराळे, नरेंद्र गिरासे, भरतरी ठाकूर, जितेंद्र गिरासे, संजय तावडे, हितेंद्र महाले, राजेश मणोत, चेतन सिसोदिया, राकेश अग्रवाल, धरमचंद बोथरा, मुकेश बंब, निलेश जैन, दिनेश कटनवाल, पपन माखिजा, संजय श्राफ, जलिल बागवान, मनोज जैन, दिलीप जाधव, दिलीप शेळके, नरेंद्र ठाकूर, संजय पाटील तसेच शहरातील सर्व कापड व्यापारी, किराणा व्यापारी सराफ व्यवसायिक, सामाजिक संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
करोना विषाणूंचा प्रादुर्भाव पुढे अजून वाढु नये व वाढणारी कोरोनाची साखळी खंडीत व्हावी, म्हणून दोंडाईचा शहरात तीन दिवस कर्फ्यु लावण्यात आला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.