नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक जिल्ह्यातील नवनिर्वाचित खासदार, मंत्री व आमदारांचा ‘जनदूत गौरव सोहळा’ दैनिक ‘देशदूत’ने उद्या शनिवारी (दि.२५) आयोजित केला आहे. सकाळी १० वाजता पलाश हॉल, गुरुदक्षिणा ऑडिटोरियम, कॉलेजरोड, नाशिक येथे हा समारंभ होत आहे.
जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारे शिक्षणमंत्री दादाजी भुसे, कृषिमंंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह माजी उपमुख्यमंंत्री छगन भुजबळ, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार अॅड. राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, आमदार सुहास कांदे, आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद, आमदार सरोज अहिरे, आमदार नितीन पवार, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार दिलीप बोरसे, आमदार सत्यजित तांबे, आमदार किशोर दराडे यांचा सत्कार देशदूत वृत्तसमूहाचे अध्यक्ष विक्रम सारडा यांच्या हस्ते होणार आहे.
समाजाच्या विविध क्षेत्रांतील गुणी जनांचा गौरव करण्याची परंपरा ‘देशदूत’ गेली अनेक वर्षे जोपासत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले जिल्ह्यातील खासदार, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री व आमदारांचा सत्कार याच परंपरेनुसार उद्या होणार आहे.
लोकप्रतिनिधींच्या गौरव सोहळ्यास नाशिककरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘देशदूत’ वृत्तसमूहाने आहे.