टाकळीमिया |वार्ताहार| Takalimiya
राहुरी तालुक्यातील जातप शिवारात 6 महिन्यांनंतर पुन्हा बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून वनखात्याने या भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
जातप परिसरात 6 महिन्यापूर्वी अशाच प्रकारे बिबट्याचे वारंवार दर्शन होत होते. मात्र, एक दिवस या बिबट्याने सकाळी 7 वा.शेतात घास कापण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलावर हल्ला करून गंभिर जखमी केले होते. वेळीच घरातील त्याचे पालकांनी मुलाच्या मदतीला धावून गेले व बिबट्याच्या तावडीतून त्या मुलाची सुटका केली होती. बरेच दिवस दवाखान्यात उपचार घेऊन तो आता बरा झाला. मात्र आता परत एकदा या बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे.
त्याला पकडण्यासाठी वनखात्याने पिंजरा लाऊन त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जातप सोसायटीचे अध्यक्ष परशराम शिंदे, सतीश शिंदे, संतोष वाघ,अनिल शिंदे, बापूराव साठे, अमोल शिंदे, सुभाष शिंदे, दादाभाई पठाण, गोरक्षनाथ बोंबले, आदिनाथ गोरे, कैलास कलवार, आदिनाथ बोंबले, रावसाहेब मोरे, भाऊसाहेब शिंदे, शरद शिंदे, भागवत जाधव, बाळासाहेब जाधव, नंदकुमार शिंदे, पोपट बर्डे, प्रभाकर शिंदे आदी शेतकर्यांनी केली आहे.