Monday, June 24, 2024
Homeनगरजातेगावला बिबट्याचा महिलेवर हल्ला

जातेगावला बिबट्याचा महिलेवर हल्ला

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

- Advertisement -

तालुक्यातील जातेगाव येथे आपल्या शेतात सकाळी जनावरांना चारा आणण्यासाठी गलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि.29) सकाळी घडली. हौसाबाई ढोरमले (60, रा. जातेगाव) असे जखमी महिलेचे नाव आहे. हौसाबाई या सुन प्रतिभा ढोरमले यांच्यासह शेतात सकाळी 9 वाजता जनावरांसाठी गवत कापण्यासाठी गेल्या होत्या. गवतातून अचानक कमी वयाचा बिबट्या बाहेर आला. त्याने सासु हौसाबाई यांच्यावर हल्ला केला.

नगरमध्ये मंदिर-मदरशावर हातोडा

होसाबाई यांनी आरडा -ओरडा केल्यानंतर लगेच त्यांची सुन प्रतिभा यांच्या मदतीला धावली. दोघीनी तेथुन पळ काढला बिबट्याने त्यांच्या मागे येण्याचा प्रयत्न केला पण लोक वस्ती जवळ असल्याने पुढे आल नाही व हल्यापासुन दोघी महिला बचावल्या. याबाबत वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी तात्काळ हजर झाले जखमी झालेल्या महिला हौसाबाई ढोरमले याना सरकारी आरोग्य क्रेद्रांत दाखल केले. या भागात नेहमी रात्री बिबट्या चा वावर असतो याच्या अगोदर ही चार ते पाच वेळा पाळीव प्राणी कुत्रे शेळी बोकड यांची बिबट्या ने शिकार केली आहे. ग्रामस्थानी पिजरा लावण्याची मागणी केली आहे.

शेतकर्‍यांकडील चारा खरेदीचे लवकरच धोरणराज्य सरकार म्हणून के. के. रेंजच्या विस्तारास विरोध

- Advertisment -

ताज्या बातम्या