Thursday, September 12, 2024
Homeनगरजातेगाव परिसरात 4 बिबट्यांचे दर्शन

जातेगाव परिसरात 4 बिबट्यांचे दर्शन

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

तालुक्यातील जातेगाव घाटात चार बिबट्यांचे दर्शन झाले आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार व वनाधिकार्‍यांनी केले आहे. 10 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास जातेगावचे सरपंच रविराज गायकवाड, त्यांचे सहकारी सुनील सखाराम गायकवाड हे खासगी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते.

- Advertisement -

शुक्रवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास जातेगावच्या घाटातून गावाकडे चालले असता त्यांना चार बिबटे आढळून आले. एक बिबट्या त्यांच्या वाहनासमोर आला. त्यांनी कार थांबविली. त्याला रस्ता क्रॉस करून दिला. त्यावेळी इतर दोन बिबटे कारच्या पाठीमागून गेले. हे बिबटे दिघोळकडून मुंगेवाडी डोंगराकडे जाताना दिसल्याचे गायकवाड यांनी सांगितले. जातेगाव घाटात बिबट्या आढळल्याचे नागरिकांनी सांगितल्यानंतर तात्काळ वन विभागाला यासंदर्भात माहिती दिली. परिसरातील शेतकरी, गुराखी व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या