Saturday, May 25, 2024
Homeनगरजवळ्यात दरोडा; पती पत्नीला मारहाण करत लाखाची लूट

जवळ्यात दरोडा; पती पत्नीला मारहाण करत लाखाची लूट

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील जवळा येथे पती-पत्नीला गंभीररित्या मारहाण करत दरोडेखोरांनी लाखाचा ऐवज लुटून नेल्याची घटना बुधवारी(दि.26) रात्री साडेबारा वाजता घडली.

- Advertisement -

प्रवीण संपत सालके व त्यांची पत्नी प्राजक्ता प्रवीण सालके हे दोघे यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संपत सालके यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुरुवारी रात्री एकच्या दरम्यान दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी सालके यांच्या राहत्या घरात दरवाजा तोडून प्रवेश केला.

काही कारण नसताना प्रवीण संपत सालके यांना डोक्यात व चेहर्‍यावर धारदार शस्त्राने वार करत गंभीर जखमी केले. त्यांच्या पत्नीने आरडाओरड करताच त्यांनाही मारहाण करत त्यांच्या अंगावरील, कानातील, सोन्याचे दागिने, गळ्यातील सोन्याचा ऐवज ओरबाडून घेतला. घरात सर्वत्र उचकपाचक केली. भयावह परिस्थितीत दोघा पती-पत्नी चोरट्यांच्या तावडीतून आपली सुटका करत शेजारी राहणार्‍या चुलत्यांच्या घरी धावत येत मदतीसाठी मदतीसाठी आरडाओरडा केला परंतु चोरट्यांनी त्यांचा दरवाजा बाहेरून लावला असल्याने त्यांना पटकन बाहेर पडता आले नाही.

तेवढ्यात चोरट्यांनी आपला डाव साधत हाती मिळेल ते घेऊन पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पाण्याची पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे तातडीने आपल्या फौज फाळके असं हजर राहत घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून पुढील तपासाच्यादृष्टीने सूत्रे फिरवली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या