Sunday, May 19, 2024
Homeनगरथोरात यांनीच राजीनामा द्यावा

थोरात यांनीच राजीनामा द्यावा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

सर्वसामान्य माणसाकरीता उपलब्ध असलेले नगरपालिकेचे कॉटेज रुग्णालय ज्यांनी बंद पाडले, ज्यांना अडीच वर्षाच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात उपजिल्हा रुग्णालय तालुक्यात सुरू करता आले नाही त्यांना महायुती सरकारमधील मंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा कोणताही अधीकार नाही. अपयशाची जबाबदारी स्वीकारून आ.थोरात यांनीच आधी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार यांनी केली आहे.

- Advertisement -

माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मागणीचा समाचार घेताना, जावेद जहागिरदार यांनी पत्रकात म्हटले आहे की, अनेक वर्षे सता असताना तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा ज्यांच्या हलगर्जीपणाने उडाला त्यांनी राज्याच्या मंत्रीमंडळाच्या राजीनाम्याची मागणी करावी याचे आश्चर्य वाटते.

संगमनेर नगरपालिकेच्या अंतर्गत सुरू असलेले कॉटेज रुग्णालय हे शहर आणि तालुक्यातील जनतेकरिता मोठा आधार होते. परंतु स्वत:च्या बगलबच्च्यांची रुग्णालये चालावी म्हणून ज्यांनी कॉटेज रुग्णालय बंद करण्यात धन्यता मानली, त्यांना स्वत:ला विकासपुरुष म्हणवून घेण्याचा तसेच सुंस्कृतपणाच्या आणि विकासाच्या गप्पा मारण्याचाही कोणाताही अधिकार नसल्याचा टोला जाहागिरदार यांनी लगावला.

गेली चाळीस वर्षे नगरपालिकेची आणि तालुक्याची सर्व सत्तास्थाने आ. थोरातांच्या ताब्यात आहे. परंतु एकही सरकारी रुग्णालय शहर आणि तालुक्यात सर्वसुविधांनी परीपूर्ण उभारले न गेल्याने सामान्य माणसाची मोठी गैरसोय झाली असल्याकडे आ. थोरात सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जहागिरदार यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या