Monday, June 24, 2024
Homeनगरजवखेडे शिवारात महिलेवर अत्याचार

जवखेडे शिवारात महिलेवर अत्याचार

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

- Advertisement -

चारचाकी मालवाहतूक गाडीतून घरी सोडतो असे सांगून शेवगाव तालुक्यातील घटस्फोटीत महिलेवर चालकाने अत्याचार केल्याची घटना शनिवारी (दि.16) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जवखेडे शिवारात घडली.

याबाबत पीडित महिलेच्या तक्रारीवरून लक्ष्मण किसन चेके (रा. निंबेनांदूर, ता . शेवगाव) याचे विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेवगाव तालुक्यातील घटस्फोटीत महिला बहिणीकडे तिसगाव येथे गेली होती. पुन्हा घरी जाण्यासाठी निघाली असता तुला चार चाकी मालवाहतूक गाडीतून घरी सोडतो असे सांगून चेके याने गाडीत बसवले.

गाडी तिसगाव -मिरी रोडने जवखेडे फाट्याजवळ आली असता पक्का रस्ता सोडून पाटाच्या कच्च्या रस्त्याने आतमध्ये अर्धा किलोमीटर नेली व गाडीतच महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर महिलेला हाणमार सुरू केली. महिलेचा आवाज ऐकून परिसरातील लोकांनी तिला त्याच्या ताब्यातून सोडवले. नातेवाईकांच्या ताब्यात दिले. पीडितेच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या