Wednesday, April 30, 2025
Homeनगरजय पवार यांच्या कर्जत, जामखेडमध्ये बैठका

जय पवार यांच्या कर्जत, जामखेडमध्ये बैठका

वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न-आ. रोहित पवार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी आ. रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात काल रविवारी महायुतीतील कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. यामुळे आता आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदार संघामध्ये जय अजित पवार निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आ. रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.

- Advertisement -

कर्जत जामखेड मतदार संघामध्ये हा राजकीय दौरा नाही. मात्र भविष्यामध्ये नागरिकांनी बोलावल्यास मी पुन्हा येईल असे उद्गार जय अजित पवार यांनी कर्जत येथे पत्रकारांशी बोलताना काढले. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी खोचक शब्दांत टीका करताना सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न भाजप आणि दादांकडून केला जात असल्याचे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी अजितदादा बोलत असतानाच काही कार्यकर्ते त्यांना भेटले आणि दादा आता तुम्ही थांबा जय पवारांना संधी द्या बोलून गेले. कार्यकर्ते म्हणत असतील तर विचार केला जाईल, असे दादा म्हणाले होते. दोन दिवसांनी जय पवार बारामतीमध्ये फिरण्याऐवजी कर्जत जामखेडमध्ये कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. यासंदर्भात पुण्यात पत्रकारांनी छेडले असता अजित दादांनी जय स्वतंत्र विचाराचा आहे. तो जर बैठका घेत असेलतर मी का विरोध करू?असा सवाल केला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘प्रवरे’च्या आजी-माजी संचालकांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण ?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात साडेआठ कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी आजी-माजी संचालक, साखर आयुक्त पुणे, संबंधित दोन...