Monday, March 31, 2025
Homeमनोरंजनजया बच्चन झळकणार मराठी चित्रपटात

जया बच्चन झळकणार मराठी चित्रपटात

मुंबई l Mumbai

बॉलिवूडच्या ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री जया बच्चन या गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयापासून दूर आहे. १९७३ मध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न झाल्यानंतर जया बच्चन

- Advertisement -

फारशा काही पडद्यावर दिसल्याच नाहीत. मात्र आता तब्बल सात वर्षानंतर त्या सिनेसृष्टीत पुनरागमन करणार आहेत. महत्वाचं म्हणजे जया बच्चन या चक्क मराठी चित्रपटामध्ये काम करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गजेंद्र अहिरे दिग्दर्शित आगामी मराठी सिनेमात जया बच्चन झळकणार आहेत. मार्चपासून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असून अवघ्या २० दिवसांत शूटिंग पूर्ण केले जाणार आहे. जया बच्चन यांनी मात्र अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केली नाही. गजेंद्र अहिरे यांनी आतापर्यंत ५० पेक्षा अधिक मराठी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. शेवरी, अनुमती तसेच द सायलेन्स या सिनेमांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.

जया बच्चन यांनी १९६३ मध्ये रिलीज महानगर या सिनेमातून बॉलिवूडमद्ये पदार्पण केले. करण जोहरच्या कभी खुशी कभी गम आणि कल हो ना हो या सिनेमात जया यांनी काम केले होते. त्यानंतर त्यांनी चित्रपटांपासून दूर राहणे पसंद केले. मात्र त्या राजकारण, समाजकारणात सक्रिय होत्या. त्यात त्यांचा प्रभाव दिसून आला आहे. २०१२ साली जया बच्चन या रितुपर्णा घोष यांच्या ‘सनग्लास’ या चित्रपटात नसीरुद्दीन शहासोबत झळकल्या होत्या. मात्र काही कारणात्सव हा चित्रपट रिलीज झाला नव्हता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : शासकीय बांधकाम ठेकेदाराचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपींवर...

0
पुणे | प्रतिनिधी | Pune शासकीय बांधकाम ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करून दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी निर्घुण खून करण्यात आल्याचा प्रकार घडला होता .या...