Thursday, March 27, 2025
Homeमनोरंजनजया बच्चन यांचा रवी किशन आणि कंगनाला टोला!

जया बच्चन यांचा रवी किशन आणि कंगनाला टोला!

दिल्ली | Delhi

संसदेत दोनही सभागृहांच्या कामकाजाचा दुसरा दिवस आहे. भाजपा खासदार रवी किशन( bjp mp Ravi Kishan) यांनी लोकसभेत सोमवारी ड्रग्ज संदर्भात भाष्य केले होते. खा. रवी किशन आणि अभिनेत्री कंगना रनौतला समाजवादी पार्टीच्या खासदार यांनी टोला लगावला आहे.

- Advertisement -

खासदार रवी किशन यांनी बॉलिवूडमध्ये ड्रग्जचं(bollywood drug connection) वाढतं प्रमाण याबाबत रवी किशन यांनी चिंता व्यक्त केली. सरकारने ड्रग्जचं सेवन करणाऱ्या आणि त्याची तस्करी करणाऱ्यांवर बंदी घालावी, अशी मागणी करताना रवी किशन यांनी एनसीबीचं कौतुकही केले. “भारतीय सिने जगतात ड्रग्ज घेणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. या प्रकरणी काही जणांना अटकही केली आहे. एनसीबीही चांगल्या प्रकारे आपलं कर्तव्य पार पाडत आहे” या शब्दात रवी किशन यांनी एनसीबी(NCB) कौतुक केले होत.

जया बच्चन यांचा रवी किशन आणि कंगणला यांना टोला..

दरम्यान,सभागृहात शून्य प्रहरामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीचा मुद्दा मांडण्यात आला होता. यावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीला काही लोकं बदनाम करत असल्याचं वक्तव्य जया बच्चन यांनी राज्यसभेत केलं होतं. “मनोरंजन विश्वातील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोललं जातंय. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणताय. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं अशी मी आशा करते. इंडस्ट्रीने नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी सरकारला मदत करायला पुढाकार घेतला आहे. आता सरकारने इंडस्ट्रीला पाठिंबा द्यावा”, असं त्या म्हणाल्या.

कंगनाचा जया बच्चन यांचा सवाल !

अभिनेत्री कंगनाने रनौतने ट्विट करत म्हंटले आहे की,”माझ्या जागी तुमची मुलगी असली, तिला मारहाण करण्यात आली असती, ड्रग्ज देण्यात आले असते आणि तिची तारुण्यावस्थेत असताना तिची छेडछाड करण्यात आली असती तरीही तुम्ही हेच म्हटलं असतं?, वारंवार थट्टा केली जात असल्याची तक्रार करणारा आणि सातत्यानं छळ होत असणारा अभिषेक एक दिवस फासावर दिसला असता तरीही तुम्ही हेच म्हटलं असतं का?” असा टोला तिनं लगावला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आर्मीची संधी हुकली… तरुणाने संपविले जीवन

0
धुळे । प्रतिनिधी- आर्मीत भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्या तालुक्यातील रामी येथील तरुणाने अवघ्या दोन गुणांनी संधी हुकल्याने नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केली. अक्षय यशवंत माळी...