Wednesday, November 13, 2024
Homeब्रेकिंग न्यूजJayakwadi Dam : तुडुंब भरलेल्या जायकवाडीचे ६ दरवाजे उघडले, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेच्या...

Jayakwadi Dam : तुडुंब भरलेल्या जायकवाडीचे ६ दरवाजे उघडले, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना

राहाता | तालुका प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्याला पाणीपुरवठा करणारे जायकवाडी धरण तब्बल 97.30 टक्के भरलं आहे. त्यामुळे आज सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत.

- Advertisement -

0.5 फुटाने धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आलाय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सध्या जायकवाडी धरणातून गोदापात्रात 3144 क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गरज भासल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येईल, अशी माहिती पाठबंधारे विभागाने दिली आहे.

गरज भासल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येईल, अशी माहिती पाठबंधारे विभागाने दिली आहे. यंदा नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यात धरणांच्या पाणलोटात चांगला पाऊस झाला. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांमधील धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परिणामी जुलै महिन्यात अवघ्या 6 टक्क्यांवर असलेलं जायकवाडी धरण सोमवारी सप्टेंबर महिन्यात 90 टक्क्यांहून अधिक भरलं.

सोमवारी सकाळी जायकवाडी धरणाचा पाणीसाठा तब्बल 98 टक्के इतका झाला होता. धरणात 15 हजार 141 क्युसेकने पाण्याची आवक सुरू असल्याने प्रकल्पाच्या सांडव्याद्वारे गोदापात्रात पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले होते. त्याचबरोबर कोणत्याही क्षणी गोदापात्रात पाणी सोडले जाईल, असं पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. यापार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला होता.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या