Friday, November 22, 2024
Homeनगरजायकवाडीच्या 18 दरवाजांतून विसर्ग सुरू

जायकवाडीच्या 18 दरवाजांतून विसर्ग सुरू

पैठण |प्रतिनिधी| Paithan

जायकवाडी धरणात नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून सातत्याने पाण्याची आवक होत असून मंगळवारी सकाळी जायकवाडी धरणाचे आणखी सहा दरवाजे अर्धा फुटाने उघडण्यात आले. यामुळे आता धरणाचे अठरा दरवाजे उघडण्यात आले असून उजवा कालवा व दरवाजे यातून 10 हजार 32 क्युसेसने पाणी विसर्ग केला जात आहे.

- Advertisement -

धरणात 10 हजार 32 क्युसेसने पाण्याची आवक होत आहे. आवकीनुसार विसर्ग केला जात आहे. जायकवाडी धरणाची पाणीपातळी 98 टक्क्यांवर गेल्यानंतर प्रशासनाने सोमवारी दोन टप्प्यांत बारा दरवाजे उघडून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. मात्र, वरील धरणातून पाण्याचा विसर्ग सातत्याने सुरू असल्याने मंगळवारी सकाळी पुन्हा आणखी सहा दरवाजे उघडण्यात आले.

यामुळे आता धरणाचे सत्तावीस दरवाजांपैकी अठरा दरवाजे उघडण्यात आले असून यातून 9 हजार 431 क्युसेकने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 10, 11,12,13, 14,15, 16, 17,18,19,20, 21,22, 23, 24, 25,26,27 क्रमांकाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या