Sunday, October 4, 2026
HomeनगरRahata : जायकवाडी नव्वदी पार! दरवाजे उघडले, विसर्ग सुरू

Rahata : जायकवाडी नव्वदी पार! दरवाजे उघडले, विसर्ग सुरू

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता 91.60 टक्के पाणी साठा झाला. या धरणातून काल मंगळवारी रात्री 7 वाजता 27 पैकी 18 दरवाजे अर्धा फूट उचलण्यात आले. त्यातून 9703 क्यूसेक ने विसर्ग सोडण्यात आला. काल सायंकाळी 6 वाजता जायकवाडी जलाशयात 91.62 टक्के पाणी साठा झाला होता. सायंकाळी 7 वाजता धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. 27 पैकी 18 दरवाजे अर्ध्या फूट उंचीवर उचलण्यात आले आहेत. या दरवाजामधून खाली गोदावरीत 9702 क्यूसेक ने पाणी सोडण्यात आले आहे. त्या अगोदर 4 दिवसांपूर्वी जायकवाडीचे कालवे सोडण्यात आले आहे.

- Advertisement -

माजलगाव धरणासाठी उजवा कालवा 1000 क्यूसेक ने, डावा कालवा 700 क्यूसेक ने सोडण्यात आले आहेत असा दोन्ही कालवे व नदी विसर्ग असा एकूण 11402 क्यूसेक ने विसर्ग सोडण्यात येत आहे. जायकवाडी जलाशयात काल रात्री 9 वाजता उपयुक्त साठा 92.26 टक्के इतका झाला होता. उपयुक्त साठा 70.73 टीएमसी इतका तर मृतसह एकूण साठा 96.79 टीएमसी इतका झाला आहे. मृतसह एकूण साठ्याची क्षमता 102 टीएमसी इतकी आहे.

दरम्यान नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत काल रात्री 9 वाजता 22770 क्यूसेक ने तर अहिल्यानगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातून 1877 क्यूसेक ने विसर्ग सुरू होता. तर जायकवाडीत याच वेळी मागील तीन तासांची सरासरी 47614 क्यूसेक ने नवीन पाण्याची आवक सुरू होती.दरम्यान गोदावरीत 1 जून पासून काल सकाळी 6 वाजेपर्यंत 45 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. अल्निनोच्या पार्श्वभूमीवर पाणलोटात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जायकवाडी जलाशयात चांगली पाण्याची आवक झाली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : तीन नेते, दोन तास अन् आमराईत काय शिजले?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधचा फॉर्म्युला आकाराला येणार की राजकीय आखाडा रंगणार, याचा फैसला होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना शनिवारी सोनईच्या ‘आमराईत’...