Wednesday, May 29, 2024
Homeनगरजायकवाडीला पाणी सोडू नये - आ. आशुतोष काळे

जायकवाडीला पाणी सोडू नये – आ. आशुतोष काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कालबाह्य झालेल्या मेंढेगिरी समितीच्या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने 2014 चे आदेशाची अंमलबजावणी करू नये व जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा फेरनिर्णय येत नाही तोपर्यंत समन्यायी पाणी वाटपाच्या नावाखाली जायकवाडीला पाणी सोडण्यात येवू नये, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

नगर नाशिकच्या धरणातून समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या आधारे जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे जलसंपदा विभागाच्या विचाराधीन आहे. त्या पार्श्वभूमीवर आ. काळे यांनी त्यांच्यासह पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ना. छगन भुजबळ, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. शंकरराव गडाख, आ. प्राजक्त तनपुरे, आ. देवयानी फरांदे, आ. माणिकराव कोकाटे, आ. दिलीप बनकर, आ. लहू कानडे आदी नेत्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बैठक घेवून चर्चा करावी व त्यानंतर योग्य तो निर्णय घ्यावा याबाबत त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या