Saturday, May 25, 2024
Homeनगरमराठवाड्याला ‘मुळा’चे पाणी सोडण्याविरोधात आ. गडाख आक्रमक

मराठवाड्याला ‘मुळा’चे पाणी सोडण्याविरोधात आ. गडाख आक्रमक

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार मुळा धरणाचे पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय झाला असून त्या विरोधात उद्या गुरुवार दि. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता घोडेगाव चौफुला येथे आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

- Advertisement -

अन्यायकारक समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार मुळा धरणाचे पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा निर्णय झाला असून त्यामुळे मुळा धरणाच्या कालव्या खालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे.

नेवासा तालुक्यातील शेती पूर्णतः मुळाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने मुळाचे पाणी मराठवाड्याला सोडल्यास नेवासा तालुक्यातील शेती पूर्णतः कोलमडून पडणार आहे. मराठवाड्याला मुळाचे पाणी सोडण्याविरोधात तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी भांडणारे कायम आक्रमक भूमिका घेणारे आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली उद्या गुरुवार 2 नोव्हेंबर रोजी घोडेगाव चौफुला रास्तारोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आपले हक्काचे पाणी वाचवण्यासाठी तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने रास्तारोको आंदोलनास उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार शंकरराव गडाख मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आलेले आहे.

मराठवाड्याला ‘मुळा’चे पाणी सोडण्याविरोधात आ. शंकरराव गडाखांच्या नेतृत्वाखाली नेवासा तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या