Wednesday, June 26, 2024
Homeनगरजायकवाडीला पाणी सोडल्यास रस्त्यावर उतरू - आ. कानडे

जायकवाडीला पाणी सोडल्यास रस्त्यावर उतरू – आ. कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

भंडारदरा, मुळा तसेच निळवंडे धरणाचे पाणी जायकवाडी धरणामध्ये सोडल्यास शेतकर्‍यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार लहू कानडे यांनी दिला आहे.

सन 2005 च्या समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याच्या बातम्या प्रसिध्द होत आहेत. तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी मुळा धरणातून मनमानी पध्दतीने निर्णय घेतल्याचे समजते. सन 2023 मध्ये श्रीरामपूर राहुरी मतदारसंघासोबतच संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, नेवासे आदी उत्तर नगर जिल्हाच नव्हे तर संपुर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्येच अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिकामध्ये 60 ते 70 टक्के घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर व राहुरी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना आकडेवारीसह निवेदनही दिले असल्याचे आ. कानडे यांनी सांगितले.

आता केवळ रब्बीचा हंगाम पाटपाण्याच्या मदतीने घेणे एवढीच छोटीशी आशा आहे. त्यामुळे भंडारदरा, मुळा निळवंडेचे पाणीच केवळ सर्व शेतकर्‍यांना तग धरुन राहण्यास उपयोगी पडणार आहे. जायकवाडी धरणामध्ये पुरेसे पाणी असल्याने भंडारदरा व निळवंडे अथवा मुळा धरणाचे पाणी सोडू नये, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, त्यामुळे जलसंपदा विभागाने असा निर्णय घेऊ नये, असेे पत्र जलसंपदा विभागाचे उत्तर महाराष्ट्राचे मुख्य अभियंता यांना दिले असल्याचे आ. कानडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या