Saturday, January 31, 2026
Homeब्रेकिंग न्यूजJayant Patil: मोठी बातमी! "अजित पवारांची शेवटची इच्छा होती की…"; जयंत पाटलांनी...

Jayant Patil: मोठी बातमी! “अजित पवारांची शेवटची इच्छा होती की…”; जयंत पाटलांनी सगळा घटनाक्रम सांगितला

सांगली | Sangli
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदासाठी शिफारस करण्यात आली आहे. आज सायंकाळी शपथविधी देखील होणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणावरुन चर्चा सुरु झाल्या आहे. आज सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाबाबात चर्चा झाल्याचे म्हणाले होते. त्यानंतर आता याबाबत नवनवे खुलासे बाहेत येत आहे. शरद पवारांच्या पक्षाकडून विलीनीकरणाबाबतच्या चर्चांमध्ये जयंत पाटील मुख्य नेते म्हणून होते, यामध्ये नेमके काय घडले होते, त्याबाबत सविस्तरपणे भाष्य केले आहे.

शरद पवार यांच्या हयातीत राष्ट्रवादी पक्ष एकत्र करायचा अशी अजित दादांची मनोमन इच्छा होती, मागच्या सहा महिन्यात झालेल्या बैठकीत अजित दादांनी ही गोष्ट बोलून दाखवली होती. शरद पवारांनी याबाबतची जबाबदारी माझ्याकडे दिली होती, अशी माहिती देखील जयंत पाटलांनी दिली आहे.

- Advertisement -

आधी एकत्रित करायचे मग नंतर बाकीचे निर्णय घ्यायचे अस अजितदादांच्या मनात
बारामतीला जी सर्व नेत्यांची बैठक झाली त्यासाठी आधी आम्ही विमानाने जाणार होतो. पण बारामतीच्या धावपट्टीवर विमान उतरेल असे विमान मिळाले नाही. १२ फेब्रुवारीला एकत्र करण्याबाबतची तारीख ठरली होती. दोन्ही पक्ष आधी एकत्रित करायचे मग नंतर बाकीचे निर्णय घ्यायचे असे अजितदादांच्या मनात होते, या चर्चामध्ये सुप्रिया सुळे यांना आवर्जून घेतले होते. सुनेत्रा वहिनींचा आज शपथविधी होतोय हा त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे; मुख्यमंत्र्यांची त्याला संमती असल्यानेच हा निर्णय होत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे निर्णय सध्या प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ घेता आहेत असे दिसतेय, या तिघांच्या मतानुसार सध्या निर्णय होतायत असे दिसते आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

YouTube video player

Sharad Pawar: “तो त्यांच्या पक्षाचा…”; सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

अलीकडच्या काळात बऱ्याच वेळेला अजितदादा माझ्या घरी आले
दादांचा अपघाती निधन झाले, त्या दिवशी संध्याकाळी प्रतिक्रिया देताना याविषयी मी भाष्य केलेले होते. अलीकडच्या काळात बऱ्याच वेळेला अजितदादा माझ्या घरी आले होते. अनेक वेळा त्यांची माझी चर्चा झालेली होती. जवळपास चार वेळा ते संध्याकाळी आले होते आणि जेवण करून चर्चा करून ते जात होते. त्यामुळे त्यांची इच्छा होती की, शरद पवार यांच्या देखतच आपल्याला दोन्ही पक्ष एकत्रित करायचे आहेत. माझ्याबद्दल जे काही जनमानसात आहे ते सगळे पुसून पुन्हा साहेबांच्या बरोबर आणि साहेबांच्या पक्षाबरोबर एकत्रित यायचे त्यासाठी ते तयार होते, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

आठ ते दहा वेळा बैठका झाल्या होत्या
अजित पवारांचा हा आग्रह होता त्यासाठी जवळपास आठ ते दहा वेळा त्यांच्या बैठका झाल्या होत्या, बैठकीचे ठिकाण माझे घरच होते. माझ्याकडे येऊन बऱ्याच वेळेला ते बोलत होते. पहिल्या चार बैठकांमध्ये तर दादा त्यांच्या भावना व्यक्त करत होते. त्यांचा साहेबांविषयी प्रचंड आदर होता, शरद पवारांच्या बरोबर जे झाले ते सगळं विसरू आपण आणि गेल्या दोन अडीच वर्षाचा कालखंड मागे टाकून आपण सगळे एक होऊ आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंध करू ही त्यांची अंतिम आणि फार तीव्र आग्रहाची भूमिका होती, असंही पाटील म्हणालेत.

आम्ही १२ तारीख आम्ही निश्चित केली
१६ तारखेला माझ्या घरीच पक्षातील काही प्रमुख नेत्यांसह त्यांची बैठक झाली. यापूर्वी देखील अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, पक्षांच्या अध्यक्षांसह बैठक झाली. १६ ला सगळेच एकत्र होतो. त्यात ठरले की आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढू. निवडणुकीच्या निकालानंतर जयंत पाटील ठरवतील ती तारीख जाहीर करू असे ते म्हणाले. आम्ही १२ तारीख आम्ही निश्चित केली.

NCP Politics: विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असतानाच मोठी घडामोड; गोविंदबागेतील ‘तो’ व्हिडीओ आला समोर

आम्ही फोन केला, तेव्हा त्यांनी सांगितले धावपट्टी लहान आहे माझे विमान काही तिकडे उतरणार नाही. आम्ही ठरवले गाडीने जाऊ आणि आम्ही पहाटे निघून सकाळी आठ वाजता शरद पवारांच्या समोर बसलो त्यानंतर तिथे सविस्तर चर्चा झाली आणि आम्ही १२ तारीख निश्चित केली. जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यानंतर आम्ही १२ तारखेला सगळे जाहीर करायचा असेल ठरवले होते. आणि त्याबाबत चर्चा केली होती, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

आधी दोन्ही पक्ष एकत्रित करायचे याच्याबद्दल दादांचा आग्रह होता. आता त्याचे बरेच तपशील आहेत, कधीतरी मोकळ्या वेळेत मी त्याचाही खुलासा करेल, पण फारच सविस्तर आणि अनेक वेळा त्याचे चर्चा आम्ही सगळ्यांनी सोबत चर्चा केली होती. काही वेळा सुप्रिया सुळे देखील त्यात उपस्थित होत्या, त्यामुळे बऱ्यापैकी चर्चा पुढे गेलेली होती. त्यांनी मला हे देखील सांगितलं होतं की सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ त्यांच्या पक्षातील अन्य आमदारांना देखील याची त्यांना कल्पना दिलेली आहे. हे त्यांनी आम्हाला स्पष्ट पणाने सांगितलं होतं. अजितदादांचं असं मत होतं की, मी जेव्हा निर्णय सांगतो, तेव्हा तुम्ही चिंता करायची गरज नाही. हे सगळे माझे जे सहकारी आहेत ते मी म्हणेन त्याप्रमाणे निर्णय घेतील असं दादांनी म्हटल्यांचंही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

नियती किती क्रूर असू शकते हे घटनेवरुन दिसून येतं
राष्ट्रवादी एकीकरणाच्या निर्णया बाबत अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे बाकीच्या नेत्यांना मी सांगितलं की एकमताने निर्णय होतो असं अजितदादांचे मत होतं, नियती किती क्रूर असू शकते हे अजित दादांच्या घटनेवरून दिसून येतं, पण विमान हवेत असताना विमानातून मोठा आवाज येत होता असं तेथील एका सरपंचांना मला सांगितलं होतं, नेमकं विमानामध्ये काय प्रॉब्लेम होता का नव्हता याबाबत ब्लॅक बॉक्समधून जे समोर येईल त्यातून काही गोष्टी समोर येतील. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, आर आर पाटील आणि माझ्यामध्ये कधी एकमेकांशी स्पर्धा झाली नाही. राजकारणामध्ये मर्यादा कशा सांभाळायच्या याचे उत्तम ज्ञान अजित दादांना होतं. अजितदादा ही कधी माझ्यावर मर्यादा सोडून बोलले नाहीत ना मी कधी त्यांच्यावर मर्यादा सोडून बोललो असंही जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलं,

त्यांना मुख्यमंत्री होता आलं असतं
त्यांच्या नेतृत्वाला मुख्यमंत्री होता आलं असतं, त्यांनी महाराष्ट्रात अधिक प्रभावीपणे काम केले असते. कामाची अंमलबजावणी करण्यात त्यांचा हातखंड होता. प्रशासनावर चांगली पकड होती. त्यामुळे अतिशय चांगलं मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रात काम केलं असतं. मी नेहमी विनोदाने म्हणायचं मी तुमचा चौघांपेक्षा लहान आहे. त्यामुळे तुमचा नंबर पुढे आहे. तुम्हाला नेहमी माझा पाठिंबाच असेल. माझ्याकडे भरपूर वेळ आहे. तुम्ही कोणत्याही पदावर जा माझ्या शुभेच्छा आहेत. त्यामुळे एकमेकांशी स्पर्धा करण हा विषय आमच्यात आला नाही.

ताज्या बातम्या

गोविंदबागेतील

NCP Politics: विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असतानाच मोठी घडामोड; गोविंदबागेतील ‘तो’ व्हिडीओ...

0
मुंबई | Mumbaiमहापालिका निवडणुकांपूर्वी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार या चर्चा सुरू होत्या. मात्र निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. शिवाय...