दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
लोकसभा निवडणूकीत (Loksabha Election) एका केंद्रीय मंत्र्याचा पराभव करत सर्व सामान्य कुटूंबातील उमेदवार भास्कर भगरे यांना दिंडोरीकरांनी निवडून दिले. त्याबद्दल दिंडोरीकरांचे (Dindori) मी आभार मानतो. तसेच आगामी विधानसभा निवडणूकीसाठी देखील पक्षाकडून अनेक इच्छुक आहेत. परंतू विधानसभा क्षेत्रातील स्थानिक प्रश्नांची जाण व ती सोडवण्याची धमक असलेला तसेच सर्व सामान्य जनतेच्या मनातील उमेदवार आपण देणार असून त्या उमेदवाराला देखील तुम्ही मोठ्या मताधिक्यांनी निवडून द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले.
हे देखील वाचा : दत्तक नाशिकची आश्वासन पूर्तता करण्यात महायुती अयशस्वी – जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची (NCP Sharad Pawar) शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने दिंडोरी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन आ.पाटील बोलत होते. शिवस्वराज यात्रा (Shivswaraj Yatra) दिंडोरीत येताच ग्रामीण रुग्णालय येथे आदिवासी पथक, ढोल ताशाचे निनादात स्वागत करत बैलगाडीमध्ये पालखेड चौफुली पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. व्यासपीठावर खा.अमोल कोल्हे, आ. सुनील भुसारा, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खेडसे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, खा. भास्कर भगरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, महिला जिल्हाध्यक्षा संगीता पाटील, हेमंत टकले, गोकुळ पिंगळे, गजानन शेलार, छबू नागरे आदी मान्यवर उपस्थित होते.
हे देखील वाचा : Jayant Patil : “गोकुळ झिरवाळांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी अर्ज”; जयंत पाटलांची माहिती
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फोडत विरोधी पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न भाजपने केला मात्र जनतेने त्यांना लोकसभेत धडा शिकवला. महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आता सरकार जाणार या भीतीने विविध योजना जाहीर करत आहे. मात्र जनतेचा या सरकारवर अजिबात विश्वास राहिलेला नसून आगामी विधानसभेत महाविकास आघाडीलाच जनता सत्ता देईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे मांजरपाडा वळण योजना कामे केले उर्वरित सर्व वळण योजनांचे कामे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मार्गी लावू, असेही त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा : Sanjay Raut : “…तर गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा” – संजय राऊत
तर खा.अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी सांगितले की, दिंडोरी लोकसभेतील जनतेनी लोकसभेत खासदार नाही तर हिरा निवडून देत महाराष्ट्र गद्दारी कधीही सहन करत नाही, हे दाखवून दिले. महाराष्ट्रातील युवक हाताला काम मागत आहेत तसेच लाडकी बहिण फक्त लाडकी नको तर सुरक्षित असायला हवी, अशा विविध प्रश्नांवर प्रकाशझोत टाकत सरकारवर हल्लाबोल केला. याप्रसंगी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खेडसे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, माजी समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, संतोष रहेरे यांनी देखील आपल्या मनोगतातून दिंडोरी-पेठ विधानसभा मतदार संघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्य सेवेचा बोजबारा, अघोषित भारनियमनाचा फटका, त्याचबरोबर प्रलंबित असलेले प्रकल्प यावर प्रकाशझोत टाकून महाराष्ट्र शासनाच्या महायुतीवर सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. यावेळी मान्यवरांचे स्वागत दिंडोरी लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी केले. प्रास्ताविक खा. भास्कर भगरे यांनी केले. आभार दिंडोरी शहराध्यक्ष नरेश देशमुख यांनी मानले. यावेळी दिंडोरी – पेठ विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे देखील वाचा : Nashik Accident News: शिवशाही बसची चार ते पाच वाहनांना धडक; दोन दुचाकींचा चक्काचूर
गोकुळ झिरवाळांची उपस्थिती चर्चेत
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ‘शिवस्वराज्य यात्रा’ आज दिंडोरीत दाखल झाली. या यात्रेत अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांची उपस्थितीत या सभेत असल्याने चर्चेत आली. गोकुळ झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागताचे फलक देखील लावलेले आहेत.त्यामुळे येणार्या विधानसभा निवडणूकीत पिता-पुत्राची लढत बघायला मिळू शकेल का? यावर चर्चा सुरु होती.
हे देखील वाचा : Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाची CID करणार चौकशी
इच्छुकांची प्रदेशाध्यक्षांपुढे नाव पोहचण्याची लगबग
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ‘शिवस्वराज्य यात्रानिमित्ताने झालेल्या सभेत विधानसभा निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवारांपैकी सुनीता चारोस्कर, गोकुळ झिरवाळ, संतोष रहेरे, प्रा. अशोक बागूल, मधुकर भरसठ, स्वप्निल गायकवाड, सुशिला चारोस्कर, पेठ शिवसेना तालुकाप्रमुख भास्कर गावित यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर आपल्यावर प्रदेशाध्यक्षांची विशेष नजर पडावी, यासाठी त्यांच्याकडून आवश्यक हालचाली होतांना बघावयास मिळाल्या.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा