मुंबई | Mumbai
यंदाच्या आयपीएल मोसमात राजस्थान रॉयल संघाचे नेतृत्व सौराष्ट्र संघाचा रणजी कर्णधार जयदेव उनाडकट याच्याकडे सोपवण्यात आले आहे. नुकतेच त्याच्या नेतृत्वात सौराष्ट्र संघाने रणजी करंडकवर नाव कोरले आहे. यामुळे राजस्थान रॉयल संघाचा कर्णधार कोण? या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळाला आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघाचा नियमित कर्णधार स्टीव्ह स्मीथ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळणार असल्यामुळे तो आयपीएलचे सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही. यंदाच्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघाच्या अडचणीत सारखी भर पडताना दिसत आहे.
सुरुवातीला संघाचे फिल्डींग प्रशिक्षक दिशांत याग्निक करोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर संघाचे तीन प्रमुख खेळाडू जोफ्रा आर्चर, बेन स्ट्रोक्स आणि जोस बटलर हे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळणार असल्याने संघाचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न संघाच्या चाहत्यांना पडला होता.
आता स्टीव्ह स्मिथचा अनुपस्थितीत राजस्थान रॉयल्स संघ उनाडकटच्या नेतृत्वात कशी कामगिरी करतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सलिल परांजपे, नाशिक