Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशJEE Advanced परीक्षा लांबणीवर

JEE Advanced परीक्षा लांबणीवर

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. परिणामी, देशातील अनेक उद्योगधंदे, व्यवसायांसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. दरम्यान, करोनाचा शिक्षण क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. करोनामुळे देशातील विविध परीक्षा रखडल्या किंवा रद्द झाल्या आहेत. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आणखी एक परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे.

- Advertisement -

IIT प्रवेश परीक्षा जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्स (JEE Advanced Exam 2021) परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. जेईई ॲडव्हान्सडच्या वेबसाईटवर या विषयी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. ही परीक्षा ३ जुलै २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार होती. यंदा कोरोनामुळं जेईई मेन परीक्षा देखील घेण्यात आलेली नाही.

देशभरात JEE Advanced 2021 परीक्षा ३ जुलै २०२१ रोजी घेतली जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरून दिली होती. यावर्षी विद्यार्थ्यांना IIT मध्ये प्रवेश घेताना ७५ टक्के ची पात्रता सुद्धा शिथिल करण्यात आल्याचं देखील पोखरियाल यांनी त्यावेळी सांगितलं होतं. अनेक विद्यार्थ्यांनी यावर्षी आयआयटी प्रवेशासाठी बारावी परीक्षेत ७५ टक्केची पात्रता शिथिल करावी अशी मागणी केली होती. त्यामुळे JEE Advanced 2021 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक दिलासा मिळाला होता. मात्र आता ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या