Friday, June 21, 2024
Homeमहाराष्ट्रJejuri Khandoba Temple : जेजुरीला खंडोबारायाच्या दर्शनासाठी जाताय? मग ही बातमी वाचाच

Jejuri Khandoba Temple : जेजुरीला खंडोबारायाच्या दर्शनासाठी जाताय? मग ही बातमी वाचाच

जेजुरी | Jejuri

- Advertisement -

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबारायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक महत्वाची बातमी. जेजुरीच्या (Jejuri) खंडोबा मंदिराचा (Khandoba Temple) गाभारा भाविकांसाठी दीड महिने बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवार दिनांक २८ ऑगस्टपासून ५ ऑक्टोबरपर्यंत मंदिराचा गाभारा हा भाविकांसाठी बंदच राहणार आहे. खंडोबा मंदिरावर असलेल्या मुख्य स्वयंभू लिंगाचा आणि अश्वाचा गाभारा हा दुरुस्तीच्या कामामुळे बंद ठेवण्यात येणार आहे.

भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घेता येणार आहे. तसेच भाविकांना कुलधर्म कुलाचार करण्यास कोणतीही अडचण येणार नाही अशा पद्धतीने नियोजन करण्यात येणार आहे. खंडोबा गडाच्या गाभाऱ्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी भाविकांना गडावर येऊन आपले कुलधर्म कुलाचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. खंडोबाची त्रिकाळ पूजा नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहे. मात्र इतर कोणालाही गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जाता येणार नाही, असे देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले आहे.

जेजुरीचा ऐतिहासिक खंडोबा गड जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विकास आराखड्याची कामे सुरू आहे. पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या दुरुस्त्या व उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी सुमारे १०७ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. गडावर विविध विकास कामे वेगात सुरू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या