Sunday, May 5, 2024
Homeनंदुरबारगणोर येथे हैदोस घालणारा बिबट्या जेरबंद

गणोर येथे हैदोस घालणारा बिबट्या जेरबंद

शहादा | Shahada | ता.प्र.

तालुक्यातील गणोर सात शेळ्यांचा फडशा पडणाऱ्या एका बिबट्याला (Leopard) वनविभागाने जेरबंद केले आहे. तर दुसऱ्या बिबट्याचे आव्हान कायम आहे.

- Advertisement -

गेल्या महिनाभरापासून तालुक्यातील गणोर व परिसरात तळ ठोकून बसलेल्या बिबट्याने पाळीव प्राणी तसेच भटक्या कुत्र्यांना लक्ष्य केले होते. परिसरात शेळ्यांची शिकार मिळत असल्याने बिबट्याने (Leopard) मुक्काम वाढविल्याचे दिसून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने ठोस उपाय करून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.

महिनाभरापूर्वी बिबट्याने गणोर येथे केलेल्या हल्ल्यात बालिका जखमी झाली होती. नंतर एका शेळीला फस्त करण्यात आले होते तर दुसरीला जखमी केल्याची घटना घडली होती. त्यातच पुन्हा बिबट्याने गणोर येथील रामदास सुकलाल ठाकरे यांच्या घराशेजारी बांधण्यात आलेल्या शेळ्यांच्या कळपावर रविवारी भल्या पहाटे बिबट्याने (Leopard) हल्ला चढविला. त्यात चार शेळ्यांचा जागेवरच फडशा पाडण्यात आला तर एक शेळी गंभीर जखमी झाली होती. नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. बिबट्या गावात घुसून पाळीव प्राण्यांना भक्ष्य करीत असल्याने गावात दहशतीचे वातावरण पसरले होते. बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली होती.

दरम्यान, वन विभागाच्या पथकाने गणोर, आंबापूर भागात रात्रीची गस्त करुन दोन वेगवेगळ्या ठिकाणी पिंजरे लावले होते. त्यातील एका पिंजऱ्यात एका बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. बिबट्याला (Leopard) जेरबंद करुन शहादा येथील वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले असून वैद्यकीय तपासणी करुन शासकीय नियमानुसार बिबट्याला वरिष्ठांचा मार्गदर्शनानुसार जंगलात सोडण्यात येणार असल्याचे तोरणमाळ येथील वन परिक्षेत्र अधिकारी एम.बी.चव्हाण यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या