Friday, September 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसोनपावलांनी जेष्ठा गौरींचे घरोघरी उत्साहात आगमन

सोनपावलांनी जेष्ठा गौरींचे घरोघरी उत्साहात आगमन

- Advertisement -

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आनंद, समाधान आणि मंगलमय वातावरण घेऊन आलेल्या ज्येष्ठा गौरींचे आज सोनपावलाने घरोघरी आगमन झाले. चैतन्य आणि आनंदाला अधीकच बहर आला आहे.गौरी आगमनाने घराघरांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महालक्ष्मीचे रूप घरोघरी सारखेच असले तरी काही आगळ्यावेगळ्या परंपरेने नटलेल्या महालक्ष्मींचे दर्शन होत आहे. जेष्ठा गौरींनाआज भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवीला गेला. सोमवारी म्हणजे उद्या महापुजा होणार आहे. त्यााकरिता सुग्रास जेवण व आकर्षक आरास, दागदागिने, आभुषणे यांची जय्यत तयारी केली झाली आहे.

देखावे, देवीच्या चेहर्‍यावर प्रसन्न भाव उमटले आहेत. मुखवट्याच्या महालक्ष्मींबरोबरच काही घरांमध्ये मात्र वेगळी परंपरा असल्याचे दिसत आहे.उद्या सायंकाळी महीलांचे हळदी कुंकु होईल. मंगळवारी गौराईला निरोप दिला जाईल.

ताज्या बातम्या

Nashik APMC News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची १४ बँक...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati जमीन संपादनाच्या वाढीव मोबदल्यापोटी थकीत असणारी तब्बल ₹३६ कोटी ५२ लाख ६३ हजार ९० रुपयांची रक्कम जमा न केल्याने नाशिकच्या...