Friday, April 25, 2025
Homeक्राईमजेऊरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

जेऊरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

किराणा दुकान फोडले || अनेक ठिकाणी चोरीचा प्रयत्न

अहिल्यानगर |तालुका प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर तालुक्यातील जेऊर येथे शनिवार 22 रोजी पहाटे चोरट्यांनी बसस्थानका शेजारील एका किराणा दुकानासह अनेक घरांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास करण्यात आल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली. चोरीच्या घटनेने परिसरामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी, छत्रपती संभाजी नगरमहामार्गालगत जेऊर बसस्थानका शेजारील अनेक घरांमध्ये चोरट्यांनी प्रवेश करून रोख रकमेसह दागिने लंपास केले आहेत. राजेंद्र पवार, रमेश मगर, नंदू मेहत्रे, संजय मेहत्रे, अनिल सुराणा, सुनील पवार, सुभाष पवार यांच्या घरी तसेच इमारत, कार्यालयामध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी पहाटेच्या वेळेस घडली. मगर यांच्या मालकीच्या जय मातादी किराणा स्टोअर्स दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत मध्ये प्रवेश केला व किराणामालासह दुकानात उचकापाचक केली. तसेच दुकानाच्या वरच्या बाजूस राहत असलेल्या रमेश मगर यांच्या घरामध्ये देखील चोरट्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. दुकानामधून किरकोळ स्वरूपाच्या साहित्याची चोरी झाली असल्याची माहिती मिळत आहे. राजेंद्र पवार यांच्या बंगल्यामध्ये प्रवेश करून रोख रक्कम लंपास केली आहे तर बंगल्यामधील सर्व कपाटांची उचकापाचक करण्यात आली.

बंगल्यामध्ये राहणार्‍या सर्वांनाच बाहेरून कडी लावून कोंडण्यात आले होते. मुलगी जागी झाल्यानंतर तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी तिथून धूम ठोकली. येथे बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची चोरट्यांनी छेडछाड केली आहे. नंदू मेहेत्रे व संजय मेहत्रे यांच्या घरून काही सोन्याचे व चांदीचे दागिन्यांची चोरी झाली आहे. सुनील पवार यांच्या इमारतीच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत मध्ये प्रवेश केला. तेथे राहत असलेल्या दर्शन मुनोत यांच्या घरामध्ये प्रवेश करण्याचाही चोरट्यांकडून प्रयत्न करण्यात आला. सुभाष पवार यांच्या घराचे कुलूप तोडण्याचाही चोरट्यांकडून प्रयत्न झाला. चोरट्यांनी सर्वच ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर बाहेरून कडी लावून घेण्यात आल्याने चोरी झालेल्या परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...