Friday, August 28, 2026
HomeनगरAccident News : ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

Accident News : ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तालुक्यातील जेऊर येथील काळे मळा परिसरात ट्रॅक्टर-ट्रॉलीने शौचालयाला दिलेल्या धडकेत शौचालयाची भिंत पडून त्यात वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दिगंबर बाबुराव काळे (वय 65, रा. काळे मळा, जेऊर) असे मयत वृध्दाचे नाव आहे.

- Advertisement -

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात शनिवारी (21 मार्च) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिनाथ दिगंबर काळे (वय 45, रा. जेऊर) यांनी फिर्याद दिली आहे. केतन संजय काळे, संजय रावसाहेब काळे, सुशाबाई रावसाहेब काळे आणि सुनिता संजय काळे (सर्व रा. काळे मळा, जेऊर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी (20 मार्च) दुपारी एक ते 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दिगंबर काळे हे घराच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयाकडे जात असताना केतन काळे याने पाहिले होते.

तरी देखील त्याने स्वतःच्या ताब्यातील ट्रॅक्टर-ट्रॉली बेदरकारपणे चालवत शौचालयाच्या भिंतीला जोरदार धडक दिली. या धडकेत दिगंबर काळे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संशयित आरोपी संजय काळे, सुशाबाई काळे व सुनिता काळे यांनी फिर्यादी आदिनाथ काळे यांना जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादी करण्यात आला आहे. या प्रकरणी केतन काळे याच्यासह चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दहा वर्षांच्या अटीमुळे निवडणुकीतून बाहेर पडलेल्यांना संधी?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सहकार संस्था निवडणूक नियम 2014 च्या 10 मधील...