Thursday, May 22, 2025
Homeनगरकारच्या डिक्कीतून सहा तोळे दागिने चोरले

कारच्या डिक्कीतून सहा तोळे दागिने चोरले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

कारच्या डिक्कीमध्ये ठेवलेले सुमारे साडे सहा तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भरत गोपाळदास देवी (वय 45 रा. ख्रिस्त गल्ली, नगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांना संशय असलेल्या कार चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर नामदेव शेळके (रा. बालिकाश्रम रस्ता, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे.

फिर्यादी यांच्याकडे असलेल्या कारवर तात्पुरता चालक म्हणून शेळके याला ठेवले आहे. 11 ऑक्टोबर रोजी दुपारी फिर्यादी यांना त्यांच्या कुटुंबासह पुणे येथे भाचीच्या वाढदिवसाला जायचे असल्याने त्यांनी कार चालविण्यासाठी शेळके याला बोलावले होते. फिर्यादीच्या पत्नीने दागिने सोबत घेतले होते व ते बॅगमध्ये ठेऊन ती बॅग कारच्या डिक्कीत ठेवली होती. कारच्या डिक्कीत दागिने असल्याची माहिती शेळके याला होती.

फिर्यादी हे 12 ऑक्टोबरला रात्री नगरमध्ये आले व त्यांनी दागिने तपासले असता त्यांना बॅगमधील सहा तोळ्याच्या चार सोन्याच्या बांगड्या, सहा ग्रॅमचे सोन्याची कर्णफुले असा तीन लाख 25 हजारांचे दागिने बॅगमध्ये नसल्याचे लक्षात आले. फिर्यादी यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास महिला पोलीस अंमलदार पटारे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Vaishnavi Hagawane Case : राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादीच्या सर्व पदांवरून हकालपट्टी;...

0
मुंबई | Mumbai गेल्या काही दिवसांपासून राज्यभर चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) आत्महत्याप्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वैष्णवी हिचे सासरे आणि त्यांच्या मुलावर मोठी कारवाई...