Thursday, May 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजCrime : लाखो रुपयांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

Crime : लाखो रुपयांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

दरवाजा तोडून चोरट्यांनी एका घरातील कपाटातून सुमारे 11 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना आनंदवली, नवश्या गणपती परिसरात घडली. यात सुमारे 10 लाखांचा ऐवज चोरी झाला आहे.

प्रवीण गोवर्धन भोळे (रा. नवश्या गणपतीजवळ, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, बंद घराचा दरवाजा उघडून चोरट्यांनी बेडरूममधील दोन कपाटांतील सामान अस्ताव्यस्त फेकले. या कपाटातील 80 हजार रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, 96 हजार रुपये किमतीचे 12 ग्रॅम वजनाचे पेंडंट व मंगळसूत्र, एक लाख 15 हजार रुपये किमतीचे 13 ग्रॅम वजनाचे फॅन्सी मंगळसूत्र, एक लाख 52 हजार रुपये किमतीचे 19 ग्रॅम वजनाचे तीन जोड कानातील टॉप्स,

एक लाख 44 हजार रुपये किमतीची 18 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 96 हजार रुपये किमतीचे 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, 40 हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडंट, 96 हजार रुपये किमतीच्या 12 ग्रॅम वजनाच्या तीन लेडीज अंगठ्या, 48 हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व 72 हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाचे दोन पाळ्यांचे मंगळसूत्र, 48 हजार रुपये किमतीची सहा ग्रॅम वजनाची लेडीज अंगठी असा एकूण नऊ लाख 87 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

गंगापूर ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सहायक निरीक्षक अहिरराव करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...