Friday, May 16, 2025
Homeक्राईमदागिने तयार व दुरूस्तीसाठी दिलेले 10 तोळ्यांचे सोने लंपास

दागिने तयार व दुरूस्तीसाठी दिलेले 10 तोळ्यांचे सोने लंपास

सराफ बाजारातील कारागिराविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

सोन्याचे दागिने तयार व दुरूस्ती करण्यासाठी दिलेले आठ लाख 30 हजारांचे 104 ग्रॅम (सुमारे 10 तोळे) सोने कारागिराने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिंगवी ज्वेलर्सच्या सावेडीतील प्रोफेसर चौकातील दुकानात हा प्रकार घडला आहे. दरम्यान, या प्रकरणी शिंगवी ज्वेलर्स प्रा. लि. चे मॅनेजर अमृत जिवराज रावल (वय 51, रा. बुरूडगाव रस्ता, सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स, अहिल्यानगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी भिमराव पाटील (रा. सराफ बाजार, अहिल्यानगर) याच्याविरूध्द बुधवारी (22 जानेवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृत हे गेल्या सात वर्षांपासून शिंगवी ज्वेलर्सच्या प्रोफेसर कॉलनी चौकातील दुकानात मॅनेजर म्हणून काम करतात.

त्यांनी 19 व 20 डिसेंबर 2024 रोजी शिवाजी पाटील याला सोन्याचे दागिने तयार व दुरूस्ती करण्यासाठी 104 ग्रॅम वजनाचे सोने दिले होते. यामध्ये 38 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चेन, 17 ग्रॅम वजनाचे एक गंठण, 29 ग्रॅम वजनाचे एक नेकलेस, आणि 20 ग्रॅम वजनाचे एक ब्रासलेट असे दागिने बनवण्यास सांगितले होते. दरम्यान, शिवाजी पाटील हा मागील 10-12 वर्षांपासून शिंगवी ज्वेलर्ससाठी काम करत असल्याने त्याच्यावर दुकान मालक व मॅनेजर यांचा विश्वास होता. दोन-चार दिवसांत सोन्याचे दागिने तयार करून देण्याचे त्यांच्यात ठरले होते. पण शिवाजीने ठरलेल्या वेळेत दागिने परत केले नाहीत.

फिर्यादी अमृत यांच्या म्हणण्यानुसार, शिवाजीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याने सुरूवातीला वेळ मागितली, पण नंतर त्याने फोन उचलणे बंद केले आणि दुकानात येणे टाळले. यावरून अमृत यांना शंका आली की, शिवाजीने विश्वासघात करत हे सोन्याचे दागिने परत न करण्याचा निर्णय घेतला आहे. तोफखाना पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेतली असून अधिक तपास पोलीस अंमलदार चांगदेव आंढळे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राजनाथ

Rajanath Singh: ‘कागज का है लिबास चरागों का शहर है, संभल-संभल...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी भुज एअरबेसवर पोहोचले. त्यांनी जवानांची भेट घेत त्यांचे भरभरून कौतुक केले....