अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अकोळनेर (ता. अहिल्यानगर) येथे संत तुकाराम महाराज यांच्या 375 व्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त आयोजित गाथा पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहात महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणार्या टोळीला उपस्थित नागरिकांनी पकडून अहिल्यानगर तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले. यामध्ये महिला व पुरूष अशा 18 जणांचा समावेश असून ते सर्व जण जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रहिवाशी आहेत.
चिरंजीव रमेश शिंदे (18), प्रभाकर गंगाधर पवार (26), अण्णा शिवाजी शिंदे (28), गयाबाई शंकर शिंदे (56), शिला शंकर गायकवाड (45), सुनीता अनिल शिंदे (42), सरिता विलास शिंदे (52), हिराबाई रमेश शिंदे (30), रूपाली प्रभाकर पवार (25), सपना कृष्णा शिंदे (28), संगीता अण्णा शिंदे (25), अंजली मंगेश शिंदे (35), शांताबाई सुनील जाधव (62), लक्ष्मी माधव पवार (32), रोहिणी किसन पवार (25), प्रियंका अमोल शिंदे (30), गयाबाई राजेश पवार (55), अनिता अर्जुन शिंदे (32) अशी पकडलेल्या 18 जणांची नावे आहेत.
दरम्यान, याबाबत कांचन सुधीर जाधव (वय 23, रा. अकोळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्यासह इतर महिला भाविकांचे एक लाख 35 हजारांचे दागिने चोरीला गेले असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. अकोळनेर येथे 16 एप्रिलपासून सोहळा सुरू होता. 23 एप्रिल रोजी सांगता होती. या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा घेत वरील 18 जणांच्या टोळींनी महिला भाविकांच्या गळ्यातील दागिने चोरले.