Monday, April 28, 2025
Homeधुळेधुळे बसस्थानकातून दोन लाखांचे दागिने लंपास

धुळे बसस्थानकातून दोन लाखांचे दागिने लंपास

धुळे । प्रतिनिधी dhule

धुळे बसस्थानकात चोरट्यांनी महिलेचे सुमारे दोन लाखांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षला सुनिल चौधरी (वय 34) रा.आळंदी रोड, दिघी पुणे या महिलेने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दि.28 जून रोजी सकाळी 11 वाजता हर्षला चौधरी या धुळे बसस्थानकात आल्या. धुळे-सुरत जाणार्‍या बस फलटावर त्या उभ्या असतांना चोरट्यांनी त्यांची पिशवी लंपास केली.

- Advertisement -

या पिशवीमध्ये एक लाख 60 हजार किंमतीची चार तोळे वजनाची सोन्याची चैन, 24 हजार रुपये किंमतीचे सहा ग्रॅम वजनाचे कानातील दागिने, चार हजार रुपये किंमतीची एक ग्रॅम वजनाची अंगठी आणि 2500 रुपयांची रोकड असा एक लाख 90 हजार 500 रुपये किंमतीचे दागिने होते. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना वाडीले हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ एप्रिल २०२५ – ही सामूहिक जबाबदारी

0
तापमानाच्या वाढत्या पार्‍याबरोबर राज्याच्या धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. राज्यात सुमारे तीन हजार छोटे-मोठे जल प्रकल्प आहेत. सद्यस्थितीत त्या प्रकल्पांमध्ये सुमारे छत्तीस टक्के...