Friday, October 18, 2024
Homeदेश विदेशझारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मोठा दिलासा; हायकोर्टाकडून जामीन मंजूर

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मोठा दिलासा; हायकोर्टाकडून जामीन मंजूर

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
कथित जमीन घोटाळ्यात गेल्या अनेक दिवसांपासून हेमंत सोरेन हे अटकेत आहेत. त्यांना आता झारखंड हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आल्याने सोरेन यांना मोठा दिलासा मिळाला आहे. १३ जून रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.

कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने ३१ जानेवारी रोजी अटक केली होती. त्यानंतर मधल्या काळात ते काही दिवस बाहेरही आले होते. आता तब्बल पाच महिन्यानंतर सोरेन यांना हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. या कारवाईमुळे सोरेन यांना मुख्यमंत्रिवरूनही दूर व्हावे लागले होते. या प्रकरणी ईडीने याआधी १४ जणांना अटक केली होती. यामध्ये आयएएस अधिकारी छवी रंजन यांचाही समावेश आहे.

- Advertisement -

दरम्यान, जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने हेमंत सोरेन यांनाही अटक केल्यानंतर देशभरात राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका रंगली होती. आता हायकोर्टाने जामीन मंजूर केल्याने हेमंत सोरेन यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या