Sunday, September 22, 2024
Homeमुख्य बातम्याजितेंद्र आव्हाड यांचा प्रकाश आंबेडकरांना इशारा, म्हणाले..

जितेंद्र आव्हाड यांचा प्रकाश आंबेडकरांना इशारा, म्हणाले..

मुंबई | Mumbai

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) जयंतीच्या दिवशी शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) भाजपा आणि शिंदे गटासहीत महाविकास आघाडीमधील नेत्यांवरही निशाणा साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांच्याबद्दलही प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) भाष्य केलं होते. यावर आता राष्ट्रवादीने इशारा दिला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या विधानामुळे खळबळ, म्हणाले पहाटेचा शपथविधी हा….

महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार यांच्याबद्दल बोलताना आदराने बोलावं, असं आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच पुढे बोलताना आव्हाड यांनी, मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही. तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी, असंही म्हटलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या ट्वीटमध्ये शेवटी, सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही, असंही राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते ?

प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार हे भाजपाबरोबर असल्याचा टोला लगावला होता. यावेळेस आंबेडकर यांनी पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत या शपथविधीनंतर अजित पवारांची (Ajit Pawar)मुलाखत छापून आलेली ज्यामध्ये त्यांनी लोक मला का दोष देत आहेत समजत नाही, हे आमच्या पक्षांचे ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो, असं म्हटल्याचा दावा केला आहे. याच टीकेवरुन (Criticism) आता जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) प्रकाश आंबेडकरांना इशारा दिला आहे.

Republic Day 2023 : दिल्लीतील ‘कर्तव्य पथा’वर पथसंचलनाला सुरुवात 112 ला कॉल करून दिली खुन झाल्याची माहिती, पुढे झाले असे काही…

- Advertisment -

ताज्या बातम्या