Tuesday, October 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजJitendra Awhad : …तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण?; ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर...

Jitendra Awhad : …तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण?; ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

मुंबई । Mumbai

आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे.

- Advertisement -

नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहे. एकदा आम्हाला पाहायचे आहेच, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय. मुंबई, ठाणे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी घोषणा त्यांनी केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, त्यांची इच्छा असेल स्वबळावर जायची तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण? पण विधानसभेच्या पराभवानंतर आपण एकत्रित राहायला पाहिजे होतं, असं माझं मत आहे. त्यामुळे हा निर्णय फार घाईने घेतलेला दिसतोय. ग्राऊंडवर कार्यकर्त्यांचं मत काय आहे हे आम्हाला माहितेय. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे असं वाटत नाही. शेवटी बळंच कोणाला तरी घेऊन जाणं आम्हाला पटणारं नाही.

अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. व्यक्तिगत पक्षाला संधी मिळत नाही, असं नाही. आमच्याही कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. आपण मतविभागणीचा फटका लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पाहिला आहे. मतविभागणीमुळे आपल्या ४५ जागा गेल्या आहेत. पण त्यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही, कारण तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. परंतु, आगामी पालिका निवडणुकीत याचा फटका १०० टक्के बसणार आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

ताज्या बातम्या

Nashik Simhastha News : कुशावर्त परिसरातील ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीला अधिक गती...

0
नाशिक | Nashik सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbhmela) ध्वजारोहण सोहळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील कुशावर्त तीर्थ परिसरात सुरू असलेली विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त...