Wednesday, April 2, 2025
Homeमनोरंजनतुम्हाला ऐकू येत असेल तर नदी बोलते तुमच्याशी...'गोदावरी'

तुम्हाला ऐकू येत असेल तर नदी बोलते तुमच्याशी…’गोदावरी’

मुंबई | प्रतिनिधी

ख्यातनाम मराठी चित्रपट अभिनेता जितेंद्र जोशी याने आता नव्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे नाव ‘गोदावरी’ असे आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रसिद्ध झाला आहे…

- Advertisement -

तुम्हाला ऐकू येत असेल तर नदी बोलते तुमच्याशी.. गोदावरी.. असं लिहीत त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन टीझर शेअर केला आहे.

यूट्यूबवरही गोदावरी सिनेमाच्या टीझरला तुफान प्रसिद्धी मिळत आहे. 1 मे 2021 रोजी अर्थात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गोदावरी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमात जितेंद्र जोशीसोबतच नीना कुळकर्णी, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे, सखी गोखले, विक्रम गोखले आणि संजय मोने असे प्रतिभावान कलाकार झळकणार आहेत.

दिग्दर्शनाची धुरा निखील महाजन सांभाळतील तर संवाद प्राजक्त देशमुख यांचे आहेत. या चित्रपटातील गाणी स्वत: जितेंद्रनी लिहीली असल्याचे समजते.

हा एक कौटुंबिक चित्रपट असून सहपरिवार सहकुटुंब चित्रपटगृहात पहावा असाच एक चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे.

गोदावरी नदी नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वतात उगम पावते, नाशिक शहर या नदीकाठी वसले आहे. त्यामुळे या चित्रपटाची नाशिककरांना ओढ असणे स्वाभाविक आहे. चित्रपटातून नेमका काय संदेश मिळणार हे मात्र चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर मिळणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Waqf Bill : ‘वक्फ’ आज लोकसभेत; विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपचा ‘बिग...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi वक्फ दुरुस्ती विधेयक आज, बुधवारी दुपारी १२ वाजता लोकसभेत सादर केले जाईल. व्यवसाय सल्लागार समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब...