नवी दिल्ली | New Delhi
हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये (Haryana and Jammu and Kashmir) विधानसभेसाठी नुकतेच मतदान पार पडले. हरियाणा राज्यात ५ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. त्यानंतर आज जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. त्यासाठी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. अशातच आता जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे.
हे देखील वाचा : Haryana and J&K Elections Results 2024 : हरियाणात भाजपची तर जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीची मुसंडी
पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती (Iltija Mufti) यांनी एक्सवर केली पोस्ट करत आपल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “जनतेचा निर्णय मला मान्य आहे. बिजबेहरामधील सर्वांकडून मला मिळालेले प्रेम आणि आपुलकी सदैव माझ्यासोबत राहील. माझ्या पीडीपी कार्यकर्त्यांचे आभार ज्यांनी या निवडणुकीत खूप परिश्रम घेतले, असे त्यांनी म्हटले.
दुसरीकडे जम्मूच्या नौशेरा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना (Ravindra Raina) पिछाडीवर आहेत. आठव्या फेरीच्या मतमोजणीनंतर रैना यांना २० हजार ३९० तर नॅशनल कॉन्फरन्सचे सुरेंद्र कुमार चौधरी यांना ३० हजार ८८३ मते मिळाली आहेत. त्यामुळे चौधरी १० हजार ४९३ मतांनी अघाडीवर आहेत. तर रैना पिछाडीवर असल्याने त्यांची चिंता वाढली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा