Monday, April 28, 2025
Homeमनोरंजनअभिनेता इम्रान हाश्मीवर जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अभिनेता इम्रान हाश्मीवर जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बाॅलिवूडचा प्रसिध्द अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) सध्या जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करतोय.

मात्र, शूटिंग संपल्यानंतर बाजारपेठेत फिरत असताना काही युवकांनी इम्रान हाश्मीवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडलीये. या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisement -

यावेळी त्याच्यासोबत इतर सहकारी होते, ते सर्व पहलगामच्या बाजारपेठेत गेला होते. यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी इमरान हाश्मी आणि इतरांवर दगडफेक केली.

याप्रकरणी पहलगाम पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका व्यक्तीची ओळख पटवून त्याला अटक केली आहे.

इम्रान हाश्मी सध्या ग्राउंड झिरो या चित्रपटाचे शूटिंग जम्मू-काश्मीरमध्ये करत आहे. हा चित्रपट सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे.

पहलगामपूर्वी इम्रान हाश्मीने १४ दिवस श्रीनगरमध्ये या चित्रपटासाठी शुटिंग केली आहे. मात्र, येथे एका घटनेमुळे चाहते त्याच्यावर नाराज झाले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Neha Singh Rathore : पहलगाम हल्ल्यासंदर्भात ‘चिथावणीखोर’ पोस्ट; गायिका नेहा सिंग...

0
दिल्ली । Delhi प्रसिद्ध गायिका नेहा सिंग राठोड हिच्याविरुद्ध लखनऊच्या हजरतगंज पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत...