Sunday, September 8, 2024
Homeदेश विदेशJammu Kashmir : जम्मू काश्मिरमध्ये पावसाचा हाहा:कार! लष्कराचे २ जवान वाहून गेले,...

Jammu Kashmir : जम्मू काश्मिरमध्ये पावसाचा हाहा:कार! लष्कराचे २ जवान वाहून गेले, अमरनाथ यात्रा स्थगित

दिल्ली | Delhi

जम्मू-काश्मिर मध्ये काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत असून हवामान विभागाकडून मागील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा देखील देण्यात आला होता. दरम्यान या मुसळधार पावसामुळे हाहा:कार उडवला आहे. मुसळधार पावसामुळे जम्मू-कश्मीरमधील पुंछमध्ये दुर्घटना घडली आहे. पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नदीचा प्रवाह ओलांडताना भारतीय लष्कराचे दोन जवान वाहून गेलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये पेट्रोलिंग दरम्यान ओसंडून वाहणारी नदी पार करण्याच्या प्रयत्नात नायब सुभेदारसह दोन जवान वाहून गेले आहेत.

- Advertisement -

Sharad Pawar : शरद पवार पुन्हा ‘पावसात’; भुजबळांच्या बालेकिल्ल्यात झाले ‘ओलेचिंब’

दरम्यान या मुसळधार पावसामुळे डोंगराळभागात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलनाच्या घटना समोर येत आहेत. सततच्या पावसामुळे काल जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग, मुगल रोड आणि श्रीनगर-सोनमर्ग-गुमारी (एसएसजी) रस्ता भूस्खलनामुळे बंद झाला होता. यानंतर आता लेह-मनाली हा महामार्ग देखील भुस्खलनामुळे बंद करण्यात आला आहे. या सततच्या पावसामुळे भुस्खलन झाल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यादरम्यान लेह-मनाली महामार्ग देखील बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लेह-मनाली महमार्ग बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली असून या रस्त्यावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्याच्या पाहायला मिळत आहे. हा रस्ता बंद झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

NCP Crisis : क्रियाशिल सदस्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा शरद पवार गटाचा प्रयत्न

या पावसामुळे अमरनाथ यात्रेसाठी गेलेले हजारो भाविक अडकून पडले आहेत. अमरनाथ यात्रेला गेलेले सुमारे ५०००० यात्रेकरू पहलगाममध्ये अडकले आहेत. याशिवाय रामबनमध्ये सुमारे ६००० यात्रेकरू अडकले आहेत. याशिवाय इतरही काही ठिकाणी भाविक अडकले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्यामुळे उधमपूरमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बिहारमधील अडकलेल्या यात्रेकरुंना स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीवरुन समजले की १९८५ नंतर आता पहिल्यांदाच पावसामुळे अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी शुक्रवार आणि शनिवारीही खराब हवामानामुळे यात्रा स्थगित करण्यात आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या