Saturday, November 16, 2024
Homeराजकीयजामखेडला शासकीय विश्रामगृहात भाजपची अल्पसंख्याक जिल्हा कार्यकारिणी जाहीर

जामखेडला शासकीय विश्रामगृहात भाजपची अल्पसंख्याक जिल्हा कार्यकारिणी जाहीर

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

अहमदनगर भाजपची अल्पसंख्याक जिल्हा कार्यकारिणी अखेर जाहीर झाली. जिल्हाध्यक्ष अमजद पठाण यांनी जाहीर केलेल्या

- Advertisement -

या कार्यकारिणीत 27 कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा कार्यकारिणीत जिल्हाउपाध्यक्ष 9 चिटणीस 8, कोषाध्यक्ष 1, प्रसिद्धी प्रमुख 1, कार्यालय प्रमुख 1, जिल्हा कार्यकारिणी सदस्य 6 यासह विविध पदांवर पठाण यांनी जामखेड शासकीय विश्रामगृह येथे या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पद दिल्याने भाजपात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे व भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अमजद पठाण यांनी जाहीर केलेली नूतन कार्यकारिणी पारनेर उपाध्यक्ष अजीज कमाल पटेल, राहुरी उपाध्यक्ष जब्बार पठाण, इनामदार श्रीगोंदा उपाध्यक्ष जावेद सिकंदर, जामखेड उपाध्यक्ष शाकीरखान आसिफखान पठाण, कर्जत उपाध्यक्ष फारुख पठाण, पाथर्डी उपाध्यक्ष- जमीर कय्युम अत्तार,

शेवगाव उपाध्यक्ष लालाभाई कादर शेख, नगर तालुका उपाध्यक्ष रशीद सय्यद, अब्दुल शेख, नगर तालुका सरचिटणीस सय्यद मुजाहिद रईस, शेवगाव सरचिटणीस मुसाभाई दगडू शेख, नगर तालुका चिटणीस रफिक पटेल, कर्जत चिटणीस इरफान इस्माईल सय्यद, जामखेड चिटणीस फय्याज शेख, नगर तालुका चिटणीस हुसेन गुलाब सय्यद, शेवगाव चिटणीस बशीर शेख, श्रीगोंदा चिटणीस युनूस अहमद नदाफ, राहुरी चिटणीस अफसर सय्यद, जामखेड चिटणीस हबीब महेबूब शेख,

शेवगाव कोषाध्यक्ष जलील इब्राहीम राजे, प्रसिद्धी प्रमुख नगर तालुका शेख महेमूद आदम, जामखेड कार्यालय प्रमुख शेरखान पठाण, जिल्हा कार्यकारिणी सदस्यः पाथर्डी सिकंदर बन्सी शेख, शेवगाव हसनभाई शेख, शेवगाव- नजीर पठाण, सज्जन पठाण, कर्जत, निजाम कासम शेख श्रीगोंदा यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

भाजपा अल्पसंख्याकची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष अमजद पठाण यांनी जाहीर केली. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या निवडी झाल्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे, आ. बबनराव पाचपुते, आ. मोनिका राजळे, माजी आ.शिवाजीराव कर्डिले, चंद्रशेखर कदम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा.भानुदास बेरड, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, जिल्हा सरचिटणीस माजी प्रसाद ढोकरीकर, दिलीप भालसिंग, बाळासाहेब महाडिक या मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा अध्यक्ष अमजद पठाण म्हणाले, जिल्ह्यातील सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाने अल्पसंख्याक कर्यकारिणीतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पीडित, शोषित, वंचित घटकांसाठी मोठे काम उभे करणार व अल्पसंख्याक मोर्चाची गाव तेथे शाखा व घर तेथे कार्यकर्ता ही योजना राबविणार असल्याचे सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या