Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेश...अन् अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अडखळले, धडपडले आणि पडले! पाहा VIDEO

…अन् अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अडखळले, धडपडले आणि पडले! पाहा VIDEO

दिल्ली | Delhi

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सतत चर्चेत असतात. सध्या बायडेन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान जो बायडन पाय घसरून अचानक स्टेजवर कोसळले. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ही घटना कोलोरॅडो येथे यूएस एअर फोर्स अकादमी पदवीदान समारंभात गुरुवारी (2 जून ) घडली. जो बाइडेन हे यूएस एअर फोर्स अकादमी पदवीदान समारंभात अध्यक्ष म्हणून आले होते. जो बाइडेन मंचावर पडल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पाहायला मिळते की, बिडेन मदतीशिवाय चालताना आणि नंतर हसत आणि त्याच्या वाहनाकडे जाताना दिसत आहेत.

२०२३ मध्ये फेब्रुवारी आणि मार्चमध्ये देखील जो बायडेन हे तोल जाऊन खाली कोसळले होते. जून २०२२ मध्ये, लॉस एंजेलिसच्या फ्लाइटमध्ये चढत असताना बायडेन कोसळले होते. यापूर्वी मे २०२२ मध्ये, अँड्र्यूज एअर फोर्स बेसवर विमानात चढताना देखील जो बायडेन यांचा तोल गेल्याने ते खाली कोसळले होते. यावेळी येथील हॅडेलच्या मदतीने त्यांनी त्वरीत स्वतःला सावरले. मार्चमध्येच एअरफोर्स वन विमानात बायडेन हे जात असतांना विमानाच्या पायऱ्यांवर ते कोसळले होते.

जो बायडेन आता ८० वर्षांचे आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर काही युजर्सनी चिंता सुद्धा व्यक्त केली. अलीकडेच राष्ट्रीय संम्मेलनच्या एका कार्यक्रमात जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होतं. त्यांनी सर्वांसमोर पीएम मोदी यांची स्वाक्षरी मागितली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या