Saturday, May 25, 2024
Homeनाशिककृउबा सचिव अरूण काळे यांची खाते निहाय चौकशी करण्याचे निर्देश

कृउबा सचिव अरूण काळे यांची खाते निहाय चौकशी करण्याचे निर्देश

पंचवटी | प्रतिनिधी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव वादग्रस्त अरुण काळे यांची खाते निहाय चौकशी करण्याचे आदेश राज्याचे सह सचिव डॉ. सुप्रिय धपाटे यांनी काढले आहेत. त्यामुळे अनेक तक्रारी असलेले अरूण काळे यांचेवर शासनाने अखेर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कार्यरत सचिव अरुण काळे यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पदावरून निलंबन का करण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी असे निर्देश मा. मंत्री (पणन) यांनी दिले होते.

त्यानुसार नाशिक जिल्हयातील दोनशे शेतकऱ्यांची टोमॅटो खरेदी प्रकरणात झालेली १९८ शेतकऱ्यांची झालेल्या फसवणूक प्रकरणाबाबत तेथील कार्यरत सचिव अरुण काळे यांना कारणे दाखवा नोटिस बजावून त्यांच्याकडुन आपल्या मार्फत खुलासा सादर करण्याबाबत सूचित केले होते.

नाशिक कृषी उत्पन्न बाजारमधील तत्कालीन संचालक शंकरराव धनवटे यांनी दिलेल्या तक्रार अर्जावर तत्कालीन मंत्री पणन यांनी काळे यांच्या भ्रष्ट व गैरकारभाराची सखोल चौकशी होऊन कायदेशीर कारवाई बाबत निर्देश दिले होते त्या अनुषंगाने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला अहवाल सादर करण्याबाबत निर्देश तत्कालीन जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था, नाशिक यांनी दिले होते.

परंतु नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही ही बाब गंभीर आहे. त्याचप्रमाणे काळे, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी सादर केलेला खुलासा शासन स्तरावरून अमान्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे तात्काळ निलंबित करण्यात यावे व खातेनिहाय निष्पक्ष चौकशी करुन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी असे आदेशात म्हटले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या