Saturday, May 18, 2024
Homeनंदुरबारजोर लगाके...हैय्या

जोर लगाके…हैय्या

सोमावल Somaval । वार्ताहर –

शहरातील बाजारपेठेत परिवहन महामंडळाची बस (Transport Corporation bus) अचानक बंद (suddenly stopped) पडल्याने बसच्या पुढेमागे वाहनांची रीघ लागली होती. त्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प (Traffic jams) झाली होती. बसच्या वाहकासह प्रवाशांनी बसला धक्का देवून (Pushing the bus) शहरातील स्मारकचौकापर्यंत बस आणली.

- Advertisement -

एसटी मंडळाची एम.एच.06 एस. 8538 क्रमांकाची बस नंदुरबारहुन तळोद्याला येत होती. सदर बस शहरातील मुख्य बाजारपेठेत आल्यावर अचानक बंद पडली. चालकाने बस सुरु करण्यासाठी प्रयत्न केलेत, परंतु बस सुरू झाली नाही. त्यामुळे अखेर वाहकांसोबत प्रवाश्यांनी बसला धक्का देत बसला स्मारक चौकापर्यंत आणून एका बाजूस लावली. यादरम्यान बाजारपेठेत दोन्ही बाजूस वाहतूक खोळंबली. बसचे इंजिन अधिक उष्ण झाल्याने बस बंद पडल्याची माहिती चालकाने दिली.

वळण रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

शहराला वळण रस्ता नसल्याने एस.टी. महामंडळाच्या बसला बाजारपेठेतून मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे बाजारपेठेत अनेक वेळेस वाहतूक ठप्प होते. अवजड वाहनांसाठी स्वतंत्र वळण रस्त्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने वळण रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. मात्र हा रस्ता प्रलंबितच आहे.

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

शहरात मुख्य बाजारपेठेत दररोज वाहतूक खोळंबते. परंतु वाहतूक शाखेचे पोलीस कुठे असतात? असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडतो. आजही बस बाजारपेठेत बंद पडल्यावर तेथे वाहतूक पोलीस नसल्याने वाहनधारकांना अधिकच मनस्ताप सहन करावा लागला. पूर्वी कायमस्वरूपी स्मारक चौकात वाहतूक पोलिसांनी उपस्थिती रहायची. परंतु काही महिन्यांपासून वाहतूक शाखेची उदासिनता दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या