Sunday, June 21, 2026
HomeनगरAhilyanagar : जूनअखेर नगर, नाशिकमध्ये मान्सून बरसण्याची शक्यता

Ahilyanagar : जूनअखेर नगर, नाशिकमध्ये मान्सून बरसण्याची शक्यता

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मंगळवार 23 जूनपासून मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्मितीची शक्यता असून या ठिकाणी सध्या पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. वेंगुर्ला, देवगड हर्णाई या मान्सून पोहोचलेल्या ठिकाणी मान्सूनच्या सरींना चालना मिळणार असून जूनमहिन्यांच्या अखेर म्हणजेच पुढील आठवड्यात नगर, नाशिक आणि खानदेशात मान्सूनच्या पावसाची शक्यता असल्याची माहिती पुण्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

- Advertisement -

मागील 2019 व 2023 या एल-निनोच्या गत दोन वर्षात, मुंबईत मान्सूनचे 25 जूनला म्हणजे त्याच्या सरासरी 11 जून या तारखेपासून तब्बल 14 दिवसांनी उशिरा आगमन झाले होते. यावर्षीही एल-निनोचे वर्ष आहे आणि अद्याप मुंबईत मान्सून पोहोचला नाही. 2026 च्या एल-निनो वर्षातसुद्धा मान्सूनचे गुरुवार 25 जूनला मुंबईत आगमनाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर बुधवार 1 जुलैपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार मान्सूनची शक्यता ही कायम आहे. यामुळे मुंबईतील दिवसाच्या दमट व रात्रीच्या उकाड्यापासुन मुंबईकरांना दिलासा कधीपासून मिळू शकतो.

शनिवार 20 जूनपासूनच वातावरण बदलास सुरवात झाली असून मुंबईकरांना दिवसाच्या दमटपणा व रात्रीच्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो. मुंबईतील मान्सूनच्या आगमनानंतर म्हणजे जुनच्या शेवटच्या आठवड्यात खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा कोल्हापूर व पश्चिम मराठवाड्यातील जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाची शक्यता आहे. पूर्व मराठवाडा व विदर्भात मात्र जुलै पहिल्या व दुसर्‍या आठवड्यात मान्सूनच्या पावसाची शक्यता जाणवते. तत्पूर्वी तुरळक ठिकाणी किरकोळ पूर्वमोसमी पावसाची शक्यता जाणवते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : माहिती अधिकार कायद्यातील बदलास विरोध

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशात आणि महाराष्ट्रात माहिती अधिकार कायदा अस्तित्वात येण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या कायद्यातील बदलांवर नाराजी दर्शवली आहे....