Tuesday, November 26, 2024
Homeभविष्यवेधआपलं नश्वर स्वरूप

आपलं नश्वर स्वरूप

सद्गुरु – एखादा मनुष्य देवाबद्दल विचार करतो म्हणून तो आध्यात्मिक बनत नाही. तुम्ही जर देवाबद्दल विचार केलात, तर सहसा तुम्ही फक्त अस्तित्वाबद्दल विचार करता. जगातील नव्वद टक्के प्रार्थना देवा, मला हे दे, मला ते दे, माझे रक्षण कर अशा स्वरुपाच्या आहेत. हे अध्यात्म नव्हे, ही निव्वळ अस्तित्व टिकवून ठेवण्याची धडपड आहे. तुम्ही फक्त तुमचे अस्तित्व दैवी माध्यमातून टिकवून ठेवत आहात, आणि आज ही या देशातील सर्वात मोठी समस्या आहे. साध्या दैनंदिन अस्तित्वाच्या तरतुदीसाठी लोकं देवाचा धावा करतात आणि त्याचा काहीही उपयोग होत नाही याचे भारत हे एक जीवंत उदाहरण आहे.

तुम्हाला जर उत्तमरित्या जगायचं असेल, तर तुम्ही फक्त तुमचे हातापाय आणि मेंदुतल्या थोड्या पेशींचावापर करायला शिकलं पाहिजे इतकंच. तर तुम्ही देवाचा विचार करता म्हणून तुम्ही आध्यात्मिक आहात असे समजूनका. तुम्ही भयभीत किंवा भुकेले असताना किंवा तुम्ही एखादी गोष्ट गमावणार आहात असे तुम्हाला वाटत असताना जर तुम्ही देवाचा विचार करत असाल, तर ते फक्त तुमचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीची धडपड आहे, ते अध्यात्म नाही. तुम्हाला जेव्हा मृत्युला सामोरे जावे लागते तेंव्हाच तुम्ही अध्यात्माचा विचार करता. तुम्ही नश्वर आहात हे जेव्हा तुम्हाला माहिती होते आणि त्याची जाणीव होते, उद्या सकाळी मरणार याची जेव्हा तुम्हाला जाणीव होते, तेव्हा हे सगळं काय आहे याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटू लागते. आज तुम्ही एक संपूर्ण, परिपूर्ण माणसासारखे दिसता, पण उद्या सकाळी कदाचित तुम्ही विरून जाल, आणि कोणालाही तुमची उणीव भासणार नाही. तुमच्याशिवाय या जगात सर्वकाही सुरळीत चाललेलं असेल. फुले अधिक चांगली बहरतील कारण खत म्हणून तुमचा उपयोग केला जाईल.

- Advertisement -

तर मग याचा अर्थ काय आहे? मी कोण आहे याचे स्वरूप तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तुम्ही कुठून आलात आणि कुठे जाणार आहात हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे. असं असेल तर मग आता एका आध्यात्मिक प्रक्रियेला सुरूवात झाली असे म्हणायला हरकत नाही. म्हणून नेहेमी मृत्यूशी जेव्हा तुमचा सामना होतो तेव्हाच तुमची आध्यात्मिक प्रक्रिया सुरू होते. प्रत्येकाने अधूनमधून स्मशानभूमीला भेट द्यायला हवी, फक्त हे ध्यानात रुजण्यासाठी एक दिवस इथंच तुम्हालासुद्धा यावं लागणार आहे. तुम्ही कदाचित असा विचार करत असाल की तुम्ही अनेक ठिकाणी फिरतीवर असता, कदाचित असा विचार करत असाल की तुम्ही मोठ मोठ्या पदवी मिळवत आहात किंवा तुम्ही काम करत आहात, किंवा हे किंवा ते अशा अनेक गोष्टी करत असाल, पण तुमचे शरीर, ते एकाच दिशेने, न डगमगता, त्याच्या शेवटच्या मुक्कामाच्या दिशेने वाटचाल करत आहे, म्हणजे सरळ स्मशानाच्याच दिशेने कूच करत आहे. हे शरीराचे स्वरूप आहे. तुम्ही जर फक्त भौतिक गोष्टींतच अडकले असाल, तर सरळ तुम्ही तुमच्या थडग्यातच चालले आहात, आणखी कुठं नाही. ज्या क्षणी जन्मालात, तेंव्हापासून तुमचे शरीर उचलत असलेले प्रत्येक पाऊल हे स्मशानाच्या दिशेने उचलले गेलेले पाऊल आहे. अरे, हा तर एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा निराशावादी मार्ग नाही का? हे सकारात्मक किंवा नकारात्मक नाही, हे तर तुम्हाला सामोरे जावे कलागणारे एक सत्य आहे.

जेव्हा तुम्ही तुमच्या अस्तित्वाचे स्वरूप नश्वर आहे, हे जाणता, तेव्हाच तुम्हाला त्यापलीकडे काय आहे हे जाणून घ्यावेसे वाटते. यापलीकडे काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा होते, तेव्हाच खरोखर आध्यात्मिक प्रक्रिया सुरू होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या