Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashikroad : नाशिकरोड न्यायालयामुळे न्यायदानाला गती - उपमुख्यमंत्री अजित पवार

Nashikroad : नाशिकरोड न्यायालयामुळे न्यायदानाला गती – उपमुख्यमंत्री अजित पवार

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

न्यायव्यवस्थेचा विस्तार आणि सुधारणा हा प्रगतीशिल समाजाचा पाया आहे. लोकसंख्येच्या आणि न्यायालयीन प्रकरणांच्या वाढत्या प्रमाणामुळे न्यायालयांवरील कामाचा ताण वाढत आहे. त्यासाठी राज्यातील न्यायव्यवस्थेचे बळकटीकरण करीत सुविधा पुरविण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. नाशिकरोडच्या नवीन न्यायालयामुळे न्यायदान प्रक्रियेला अधिक प्रभावी आणि गतिमान करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे व्यक्त केला.

- Advertisement -

नाशिकरोड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर या न्यायालयाचे उद्घाटन आणि ई सेवा केंद्र, ई ग्रंथालय आदींचे उद्घाटन आज दुपारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयातील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.

यावेळी अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा नाशिकचे पालक न्यायमूर्ती सारंग कोतवाल, न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे, न्यायमूर्ती किशोर संत, न्यायमूर्ती मिलिंद साठे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुदाम गायकवाड, जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. एम. दळवी उपस्थित होते.

राज्यात कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात 27 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित केल्या आहेत. या व्हॅनच्या माध्यमातून घटनास्थळी न्याय वैद्यकीय परीक्षण केले जाणार आहे. त्यासाठी पोलीस दल प्रशिक्षित केले जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रे येथे साकारण्यात येणार्‍या अद्ययावत इमारतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

न्यायमूर्ती कर्णिक म्हणाले की, सुदृढ समाजासाठी न्यायपालिका आवश्यक आहे. न्यायालयाच्या इमारत बांधकामांसाठी राज्य सरकारचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी उकृष्ट वास्तू रचनाकार उपलब्ध करून दिले आहेत. राज्यात न्यायालयीन इमारतीसाठी पाठपुरावा सुरू आहे. न्यायालयात आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

न्या.कोतवाल यांनी सांगितले की, जनसेवेसाठी न्यायपालिकेला अधिकार दिले आहेत. सुदृढ समाज आणि खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी न्यायाधीशांची संख्या वाढवून पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

न्या. मोरे म्हणाले की, नाशिकरोड येथील न्यायालयामुळे वेळेची बचत होईल. न्यायमूर्ती संत म्हणाले की, न्यायालय हा समाजाचा आधार असतो. सुसंस्कृत समाजात न्यायालयाचे महत्व आहे. न्याय जलद, सुलभ आणि कमी खर्चात मिळण्यासाठी नाशिकरोड येथील न्यायालय उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. न्यायमूर्ती साठे म्हणाले की, नाशिक शहरासाठी आणखी एक न्यायालय उपलब्ध झाले आहे. रेल्वे स्थानकापासून हे न्यायालय जवळ आहे. त्यामुळे पक्षकारांना न्याय लवकर मिळण्यास मदत होईल.

नाशिकरोड वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुदाम गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की उपमुख्यमंत्री अजित दादा हे शब्द पाळणारे असून त्यांनी दिलेला शब्द पाळला, त्यांच्यामुळेच आज हे न्यायालय सुरू होत आहे, याचा मला अभिमान आहे असे बोलून अ‍ॅड. गायकवाड म्हणाले की, वकिलांना चेंबरसाठी जागा द्यावी. त्याचप्रमाणे पार्किंगचे या ठिकाणी मोठी अडचण आहे. त्यासाठी सुद्धा जागा द्यावी, अशी मागणी यावेळी गायकवाड यांनी केली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जगमलानी यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी आ. दिलीप बनकर, आ. सरोज अहिरे, नाशिकरोड व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, संचालक सुधाकर जाधव, नितीन खोले, तसेच अ‍ॅड. रवींद्र पगार, अर्जुन टिळे, अ‍ॅड. जयंत जयभावे, अ‍ॅड. अविनाश भिडे, अ‍ॅड. परिजात पांडे, अ‍ॅड. सुनील शितोळे, अ‍ॅड. प्रकाश गायकर, अ‍ॅड. भीमजी आरणे, अ‍ॅड. संग्राम पुंडे, अ‍ॅड. अविनाश भोसले, अ‍ॅड. दमयंती दोंदे, अ‍ॅड. विष्णू मानकर, अ‍ॅड. मनीषा बेदरकर, अ‍ॅड. प्रमोद कासार यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...