Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशमराठमोळे उदय लळित देशाचे ४९ वे सरन्यायाधीश

मराठमोळे उदय लळित देशाचे ४९ वे सरन्यायाधीश

दिल्ली | Delhi

भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. उदय लळीत (CJI Uday Lalit) यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह इतर मंत्रीदेखील उपस्थित होते.

- Advertisement -

उदय लळीत हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. शपथविधी सोहळयाला त्यांच्या घरातील ३ पिढ्यांनी हजेरी लावली आहे. वकिली पेशा हा त्यांच्या घरातच आहे. लळीत यांच्या नियुक्तीने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. सरन्यायाधीश न्या. उदय लळीत यांचा कार्यकाळ तीन महिन्यांपेक्षाही कमी असणार आहे. उदय लळीत 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या