Saturday, July 27, 2024
Homeनगरथांबलेला विषय समोर का आला ?

थांबलेला विषय समोर का आला ?

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

लष्काराच्या के. के. रेंजच्या विस्ताराचा विषय तिन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामार्फत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन त्याच वेळी थांबविण्यात आला आहे. असे असतानाही लष्कराने पुन्हा प्रस्ताव दिला असून तो आताच समोर का आला याचे अकलन होत नाही. भूसंपादनाबाबत सर्व अधिकार राज्य सरकारचे आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रस्तावास विरोध करणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा प्रस्ताव मंजूर होऊ देणार नाही व भूसंपादनही होऊ देणार नाही, असे आ. निलेश लंके यांनी सांगितले.

- Advertisement -

आ. लंके महणाले, दोन वर्षापूर्वी लष्कराकडून के. के. रेंजच्या विस्तारासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव आल्यानंतर नाशिक, नगर येथील कागदपत्रांचे संकलन करण्यात येऊन जेष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. तीन तास चाललेल्या या बैठकीत पवार यांनी दुष्काळी असलेल्या या भागात मुळा धरणामुळे समृध्दी आली असून तेथील शेती बागायती झाली आहे. जनावरांचे गोठे, दुग्ध उत्पादन यामुळे येथील नागरिकांचे जीवनमान उंचावत आहे.

या भागात मोठया प्रमाणावर आदिवासी समाज वास्तव्यास असून वन जमीनींवर त्यांची उपजिविका अवलंबून आहे. यापूर्वी या भागातील जमीनीचे के. के. रेंजसाठी भूसंपादन करण्यात आले आहे. आणखी भूसंपादन केल्यानंतर सरावादरम्यान करण्यात येणार्‍या स्फोटामुळे मुळा धरणास धोका होऊ शकतो. धरण फुटले तर राहुरी, नेवाशासह मराठवाडयातील गावे वाहून जातील. अशी माहिती यावेळी देण्यात आली होती. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर संरक्षणमंत्री सिंह यांनी हा विषय इथेच थांबविण्यात येत असून भूसंपादन होणार नसल्याचे जाहीर केले होते असे आ. लंके यांनी सांगितले.

के. के रेजच्या विस्तारासाठी वाढीव जमीन भूसंपादन करण्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली व त्याचे पडसाद पारनेर तालुक्यात उमटू लागले. लोकप्रतिनिधी व सामान्य नागरिकांनी जमीन देण्यास विरोध केला आहे. याबाबत प्रांत अधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याने पारनेर तालुक्यातील किती जमीन जाते व यात किती गावे व किती शेतकरी बाधित होत आहे, या विषयी सविस्तर आकडेवारी मिळू शकली नाही. मात्र, विषयावर विरोध करून पारनेर तालुक्यातील जमिन लष्काराला संपादीत करून देणार नाही, असे आ. लंके यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या