Saturday, May 25, 2024
Homeमनोरंजन‘कब्जा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘कब्जा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई | Mumbai

मोठ्या कालावधीनंतर बॉलीवूड (Bollywood) च्या पठाण ने बॉक्स ऑफिसवर आपला दरारा निर्माण केला होता. मात्र, आता परत दाक्षिणेकडील चित्रपट बॉक्स ऑफिसवर ‘कब्जा’ मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे…

- Advertisement -

दाक्षिणात्य चित्रपटांनी (South movies) गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. यामुळे कधी नव्हे तो इतका काळ बॉलीवूडला पर्याय म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मोठ्या काळानंतर अलीकडे पठाणच्या रूपाने बॉलिवूडला पुन्हा अच्छे दिन आल्याचे दिसत होते, त्यामुळे बॉलिवूडची थोडी मरगळ बाजूला सारली गेली होती.

शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याने आणले अश्रू; दर घसरताच केली कांद्याची होळी

मात्र, आता दाक्षिणात्य चित्रपट पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर (box office) ‘कब्जा चित्रपटाच्या’ माध्यमातून कब्जा मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘कब्जा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून हा ट्रेलर प्रदर्शित होताच काही तासात लाखो नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे, विशेष म्हणजे बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीही ‘कब्जा’ चित्रपटाला पसंती दिली असून त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ट्रेलर शेअर केले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

‘कब्जा’ (Kabzaa) ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन, करारी संवाद, पार्श्वसंगीताचे दमदार मिश्रण दिसून येते. या चित्रपटाच्या संहितेला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. क्षणात स्वातंत्रपूर्व काळातील इतिहासात घेऊन जाण्याचे सामर्थ्य या सादरीकरणात दिसून येते. आनंद पंडित (Anand Pandit) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून येत्या १७ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या