Saturday, May 4, 2024
Homeनगरकडबाकुट्टी मशीनद्वारे व्यापार्‍याची फसवणूक

कडबाकुट्टी मशीनद्वारे व्यापार्‍याची फसवणूक

पाथर्डी |प्रतिनिधी|Pathardi

तालुक्यातील मिरी येथील दुकानदारास दोन कडबा कुट्टी मशीन पाठवा असे फोनवर सागून. पाठवलेले कडबा कुट्टी मशीन परस्पर उतरून घेते. 74 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी अहमदनगर येथील व्यापार्‍याने शेवगाव येथील वडुले गावच्या व्यक्तीच्या विरोधात पाथर्डी पोलीस फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

दिपक गणेश गुगळे (रा. वडुले, ता. शेवगाव) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी दत्तराज रावसाहेब अडसुरे (रा. पाईपलाईन रोड, अहमदनगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अडसुरे यांचे अहमदनगर येथे शर्मिला ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. दुकाणात कडबाकुट्टी मशिन, मिल्किंग मशीन व इतर साहित्य विकण्याचा व्यवसाय आहे. गुरुवारी (दि.8) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना मोबाईलवर फोन आला. त्या व्यक्तीने ते मिरी (ता. पाथर्डी) या ठिकाणी विघ्नेश्वर ट्रेडींग या नावाचे दुकाण आहे. त्यांना कडबाकुट्टीच्या पाच मशनेरी पाहीजे आहे. त्या मिरी येथे पाठवुन द्या तेथे मशीन पोहचल्यानंतर पैसे देतो असे सांगितले.

टेम्पोमध्ये पाच कडब कुट्टी मशीन भरून चालकाकडे सदर मोबाईल नंबर देऊन मीरी येथे पाठवले. चालकाने सदर व्यक्तीला फोन लावला. त्याचे सांगण्यावरून चार कडबा कुट्टी मशीन सायंकाळी पाच वाजता मिरी येथे अनोळखी लोकांनी पिकप टेम्पोमध्येे उतरून घेतल्या. एक कडबा कुटी मशीन माका तालुका नेवासा येथे घेऊन जाण्यास सांगितले. तेथे एक मशीन उतरून घेतो व सर्व पैसे देतो असे फोनवर सांगितले . टेम्पोपो चालक एक मशीन घेऊन माका येथे गेला मात्र तेथे कोणीच आले नाही. फसवणूक झाल्याची लक्षात येताच पोलीसांत धाव घेतली. अडसुरे यांच्या फिर्यादीवरून गुगळे यांच्या विरोधात 74 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या