Friday, April 18, 2025
HomeनगरAhilynagar : न्यायालयाच्या आदेशाने ‘त्या’ कॉलेजची जागा रिकामी

Ahilynagar : न्यायालयाच्या आदेशाने ‘त्या’ कॉलेजची जागा रिकामी

परीक्षा काळात विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भाडेकराराबाबत न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा विरोधात निकाल गेल्याने न्यायालयाच्या आदेशाने बोल्हेगाव उपनगरातील मनमाड रस्त्यालगत असलेल्या काकासाहेब म्हस्के मेडिकल व नर्सिंग कॉलेजची जागा बेलीफ व एमआयडीसी पोलिसांच्या बंदोबस्तात संकुलातील सर्व महाविद्यालये, हॉस्टेल, हॉस्पिटल, कार्यालय, कॅन्टीग खाली करून जागेचा ताबा घेण्यात आला. दरम्यान, संकुलात सुमारे 900 विद्यार्थी शिकत असून, ऐन परीक्षेच्या तोंडावर कॉलेज बंद झाल्याने त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. जागामालक अनिल जाधव यांनी ही जागा ताब्यात घेतली आहे.

- Advertisement -

काकासाहेब म्हस्के कॉलेजने ही जागा भाडेतत्त्वावर घेतली होती. या भाडे कराराबाबत सन 2005 पासून न्यायालयात वाद सुरू होता. 2018 मध्येच न्यायालयाने कॉलेजची जागा रिकामी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, महाविद्यालयाकडून हे आदेश पाळले गेले नव्हते. यंदाही विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते आणि शिक्षण सुरू होते. मार्च 2025 मध्ये न्यायालयाने पुन्हा आदेश देत म्हस्के कॉलेजने जागा रिकामी करून ती अनिल जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर 17 एप्रिल रोजी पोलीस बंदोबस्तात सदर जागा ताब्यात घेण्यात आली. यावेळी अचानकपणे कॉलेज व वसतिगृह रिकामे करण्याचे सांगण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- व्यवस्थापक
कॉलेज प्रशासनाने यासंदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितले की, गुरूवारी काही लोकांनी कॉलेजमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांची जबाबदारी आम्ही घेतली आहे आणि भविष्यातही घेणार आहोत. जो काही गोंधळ झाला, त्याचे व्यवस्थापन आमच्याकडून केले जात आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

AMC : ‘एआय’ तंत्रज्ञान ठेवणार सफाई कामगारांवर वॉच

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरात साफसफाई करणार्‍या सफाई कामगारांच्या कामचुकारपणाला आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी लगाम घालण्याची तयारी सुरू केली आहे. सफाई कामगारांना त्यांच्या कार्यक्षेत्रात...